🕒 1 min read
वेळेवर तळकोकणात धडकलेला मान्सून अचानक एकाच जागी का रेंगाळलाय? यंदा चांगला पाऊस होईल या आशेवर असलेल्या बळीराजाची चिंता आता वाढू लागली आहे.
६ जून रोजी तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूनला (Maharashtra Monsoon) अचानक ब्रेक लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हर्णे येथेच स्थिर असून तो पुढे सरकत नसल्याचं चित्र आहे.
Maharashtra Monsoon
हवामान विभागाने (IMD Weather Forecast) दिलेल्या माहितीनुसार, मान्सून पुढे सरकत नसल्याने चिंतेचं वातावरण आहे. राज्यात मान्सून काहीसा लांबणीवर पडण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. साधारणपणे ७ ते ११ जून या काळात मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून पोहोचतो, पण यंदा हे वेळापत्रक कोलमडणार असंच दिसतंय.
दुसरीकडे, मुंबईकरांची अवस्था उकाड्याने अत्यंत वाईट झाली आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे घामाच्या धारांनी नागरिक हैराण झालेत. आज उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, पण हवामान विभागाने फक्त हलक्या किंवा मेघगर्जनेसह पावसाचीच शक्यता वर्तवली आहे. मुंबईत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय.
तिकडे विदर्भातही पुन्हा एकदा उन्हाचा कडाका जाणवू लागलाय. सुदैवाने, शुक्रवार आणि शनिवारच्या आसपास तिथे पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा प्रभाव आता हळूहळू कमी होताना दिसतोय.
आता लक्ष लागून आहे ते पुढील ३ ते ४ दिवसांवर. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत मान्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार होऊ शकतं. तोपर्यंत तरी उन्हाच्या झळा आणि पावसाची प्रतीक्षा हेच चित्र राज्यात पाहायला मिळेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; अचानक भाव का कोसळले? जाणून घ्या
- ‘मुंबईवर आपलं वर्चस्व, मराठी माणसांना प्रवेश नको’; प्रसाद वेदपाठकच्या ट्विटवर रिप्लाय, पोस्ट व्हायरल
- पोलीस अधीक्षकांची ‘धडक मोहीम’, मात्र बिडकीन पोलिसांचा अजब कारभार; गाडी ठाण्यात अन् चलन दुसऱ्याच गावात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












