Share

‘मुंबईवर आपलं वर्चस्व, मराठी माणसांना प्रवेश नको’; प्रसाद वेदपाठकच्या ट्विटवर रिप्लाय, पोस्ट व्हायरल

घाटकोपरमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद मिटल्यानंतर आता ‘मुंबईत केवळ जैनांसाठीच सोसायट्या उभारून मराठी माणसांना रोखा’ अशा वादग्रस्त ट्विटमुळे संतापाची लाट उसळली आहे.

Published On: 

Prasad Vedpathak White Line Controversy controversial tweet screenshot

🕒 1 min read

घाटकोपरमधल्या एका सोसायटीत जैन साध्वींसाठी मारलेली पांढरी पट्टी हटवली गेली, आणि वाद मिटला असं तुम्हाला वाटलं असेल ना? पण थांबा. आता या वादाला एक वेगळंच आणि अत्यंत धक्कादायक वळण लागलंय.

युट्यूबर प्रसाद वेदपाठकच्या (Prasad Vedpathak) सोसायटीत रंगवलेली (Jain Society Controversy) ती पांढरी पट्टी काल हटवण्यात आली. प्रसादनं “माझ्यासाठी हा प्रश्न संपला” अशी पोस्ट करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला खरा. पण, याच पोस्टवर एका युजरने केलेला रिप्लाय आता सोशल मीडियावर आगीसारखा पसरतोय.

Prasad Vedpathak White Line

‘श्रमण’ नावाच्या एका ट्विटर हँडलवरून अत्यंत गंभीर दावा करण्यात आला आहे. “आपण जैनांनी मुंबईत केवळ जैनांसाठीच स्वतंत्र सोसायट्या उभारल्या पाहिजेत आणि तिथे कोणत्याही मराठी व्यक्तीला प्रवेश देऊ नये. आपण दाखवून दिलं पाहिजे की मुंबईवर आपलंच वर्चस्व आहे आणि आपणच इथले सर्वेसर्वा आहोत”, असं या ट्वीटमध्ये म्हटलंय.

एवढंच नाही, तर दिगंबर आणि श्वेतांबर अशा दोन्ही पंथांमधील जैन बिल्डरांनी हा उपक्रम प्रत्येक शहरात राबवावा, अशी मुक्ताफळंदेखील उधळण्यात आली आहेत. यामुळे आता सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून अनेकजण याला कडाडून विरोध करत आहेत.

फेसबुकवरील ‘अजिंठा’ या पेजनं या वादग्रस्त ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत जोरदार पलटवार केलाय. “जैन ओन्ली सोसायट्या बनवून मराठी लोकांना हाकलण्याची भाषा करतोय? मुंबईवर राज्य करायला काय स्वतःला डॉन नंबर वन सुर्याभाई समजतोस की काय?” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय.

तसेच, “गावागावात जैन ओन्ली सोसायट्या बनवण्यापेक्षा तू एक स्वतंत्र देश जैनिस्थान बनवून त्यातच शिफ्ट का नाही होत? तिथे काळ्या डांबराऐवजी पांढऱ्या फेव्हीकॉलचे रस्ते बनवून घे”, असा सणसणीत टोलाही या पेजनं लगावलाय.

मूळ वाद हा प्रसाद वेदपाठक यांच्या सोसायटीत परवानगीशिवाय मारलेल्या पांढऱ्या पट्टीवरून सुरू झाला होता. त्यावेळी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप प्रसादनं केला होता. आता ती पट्टी हटवली असली तरी, या नव्या ट्विटमुळे राजकारण आणि समाजकारण दोन्ही तापलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप प्रशासनाकडून किंवा अधिकृत सूत्रांकडून कोणतीही कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही