Share

जेजुरी गडावरील ‘भंडारा म्हणजे शुद्ध हळद’ म्हणून जाहीर करा; विक्रम पाचपुते यांची तुकाराम मुंढेंकडे मागणी

जेजुरी गडावरील भंडाऱ्यात विषारी रसायनांची भेसळ होत असल्याने आमदार विक्रम पाचपुते यांनी तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. लवकरच यावर कठोर परिपत्रक निघण्याची शक्यता आहे.

Published On: 

Bhandara Issue In Maharashtra - MLA Vikram Pachpute meets FDA Commissioner Tukaram Mundhe.

🕒 1 min read

जेजुरीच्या खंडोबा गडावर उधळला जाणारा पवित्र ‘भंडारा’ (Bhandara Issue) खरोखरच शुद्ध आहे की त्यात विषारी रसायनांचा खेळ सुरू आहे? नुकतीच भंडाऱ्याला अचानक आग लागल्याची एक धक्कादायक माहिती समोर आल्याने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेत भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी थेट अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची भेट घेतली आहे. ‘भंडारा म्हणजे शुद्ध हळद’ अशी अधिकृत घोषणा करावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली असून मुंढेंनीही यावर मोठं आश्वासन दिलं आहे.

Bhandara Issue In Maharashtra

सध्या कायद्यात ‘भंडारा’ म्हणजे नेमकं काय, याची कोणतीही ठोस व्याख्या नाही. याच तांत्रिक त्रुटीचा फायदा घेत देवस्थानांच्या बाहेर रासायनिक आणि ज्वलनशील रसायने मिसळलेला बनावट भंडारा सर्रास विकला जात आहे.

जेजुरी गडावर भंडाऱ्याला लागलेली आग याच भेसळीचा परिणाम असल्याचा संशय आहे. हाच केमिकलयुक्त भंडारा उधळताना भाविकांच्या श्वासावाटे शरीरात जात असल्याने आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे, असा मोठा गौप्यस्फोट पाचपुते यांनी केलाय.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पाचपुते म्हणाले, “पूर्वीपासून भंडारा म्हणून केवळ शुद्ध हळदच विकली जायची. पण आता मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याने भाविकांच्या श्रद्धेशी खेळ सुरू आहे.” त्यामुळेच कायद्यात बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दुसरीकडे, तुकाराम मुंढे यांनी या विषयावर अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच ‘भंडारा म्हणजेच हळद’ असं स्पष्ट करणारं अधिकृत परिपत्रक एफडीएकडून काढलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!