🕒 1 min read
सोलापूर: मुलांना केवळ मराठीच नव्हे, तर अन्य भाषांचेही ज्ञान असणे आजच्या युगात आवश्यक आहे, असे स्पष्ट मत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे ( Jaykumar Gore ) यांनी सोलापूरमध्ये व्यक्त केले. भाषा आणि शिक्षणाच्या या मुद्द्यावरून राज्यात जाणीवपूर्वक राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सोलापुरात संत गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी आले असताना, प्रसारमाध्यमांशी बोलताना गोरेंनी हे मत मांडले. ते म्हणाले, “समस्त महाराष्ट्रवासीयांना मराठी भाषेविषयी नितांत आत्मीयता आहे, यात शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी काम केले आहे, हे आपण पाहिले आहे.”
पुढे बोलताना गोरे म्हणाले, “मराठी भाषेचा सन्मान केला जात असतानाच, मुलांनी मराठीसोबत अन्य काही भाषांचे ज्ञान घेणे त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. यामागे मुलांनी मराठीसह अन्य भाषाही शिकाव्यात, हीच प्रामाणिक भावना आहे. शिक्षण विभागाने कुठेही हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही,” असे त्यांनी ( Jaykumar Gore ) ठामपणे सांगितले.
मात्र, काहीनी भाषेचा आणि मुलांच्या शिक्षणाचा विषय राजकारणासाठी वापरल्याचा आरोप गोरेंनी केला. “आपण आजही इंग्रजीसारखी परकीय भाषा शिकतच आहोत. मग मुलांनी हिंदीच नाही, तर अन्य प्रादेशिक भाषा शिकल्याने त्यांचे नुकसान न होता, उलट फायदाच होईल,” असे ते म्हणाले. सरकारने शैक्षणिक धोरणाने हिंदी सक्तीची केली, असे वातावरण निर्माण करून काही जणांनी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाषावाद आणि प्रांतवाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगताना, गोरेंनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
📌 महत्वाच्या बातम्या
- जुलै महिन्यात तुमचा जन्म आहे? मग हे नक्की वाचा, नशिबाची दारं उघडणार!
- ५० हजार कोटींच्या शक्तीपीठ महामार्ग घोटाळ्यात तुमचाही वाटा असेल; राजू शेट्टींचा लोकप्रतिनिधींना थेट इशारा!
- मुंबईत अवजड वाहतूकदारांचा बेमुदत संप; शालेय बसेस, कंटेनर वाहतूक ठप्प, वारकरीही अडचणीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












