मुंबई | प्रतिनिधी- राज्यात महिला सुरक्षेच्या प्रश्नावर टीका वाढताना दिसत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांनी राज्य महिला आयोगावर मोठा आरोप केला आहे. शर्मा म्हणाल्या, “महिला आयोगात जर तक्रार राजकीय व्यक्तीविरोधात असेल, तर त्यावर काहीही कारवाई केली जात नाही. मी स्वतः याची शिकार ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.”
करुणा मुंडे म्हणाल्या, “राज्य महिला आयोग काय करतं, हेच कळेनासं झालंय. आयोगावर कोणतीही अराजकीय, निःपक्ष स्त्री असावी, ती कोणत्याही पक्षाशी संबंधित नसावी, ही काळाची गरज आहे.” मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महिला अत्याचारांच्या प्रकरणांत न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र संस्था स्थापण्याची मागणी केली आणि “कोणी नसेल तर ही जबाबदारी माझ्यावर सोपवा,” असंही सांगितलं.
Karuna Sharma slams Rupali Chakankar
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी देखील महिला आयोगावर अराजकीय व्यक्ती नेमण्याची मागणी करताना म्हटलं की, “महिला आयोग हे घटनात्मक पद आहे. त्यावर राजकीय नेत्यांच्या जवळच्या महिलांना बसवणं चुकीचं आहे. यामुळे महिलांना न्याय मिळत नाही.”
📌 महत्वाच्या बातम्या
- तक्रारींचा पाठपुरावा करा, न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे – रुपाली चाकणकरांचं आश्वासन
- राष्ट्रवादीचे विलिनीकरण थांबवलं… पण का? संजय राऊतांनी सांगितली ‘ती’ खरी कारणं!
- “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” कृषीमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान!
Ask Maharashtra Desha
तुमच्या प्रश्नाचे उत्तर आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास Web Search fallback वापरला जाऊ शकतो.









