Share

पैशासाठी सतत विका; ‘मातोश्री’वरील आंदोलनाला ‘भाडोत्री’ शिक्का

🕒 1 min readराजेभाऊ मोगल | छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मुद्द्यावरून राजकारण तापलेले असतानाच ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी कालपासून सुरू असलेल्या आंदोलनावर सोशल मीडियातून ‘भाडोत्री अभियान’ असल्याची जोरदार टीका होत आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे महत्व कमी करण्यासाठीचा हा सरकारी प्रयत्न असल्याची टीका सुरू झाली आहे. मराठा आरक्षणासाठी … Read more

Published On: 

🕒 1 min read

राजेभाऊ मोगल | छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मुद्द्यावरून राजकारण तापलेले असतानाच ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी कालपासून सुरू असलेल्या आंदोलनावर सोशल मीडियातून ‘भाडोत्री अभियान’ असल्याची जोरदार टीका होत आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे महत्व कमी करण्यासाठीचा हा सरकारी प्रयत्न असल्याची टीका सुरू झाली आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर दहा महिन्यापूर्वी लाठीचार्ज झाला आणि या आंदोलनाला व्यापक स्वरूप आले त्यानंतर या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या म्हणून जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरे करून समाजाला एकत्र करण्याचे काम सुरू ठेवले मात्र या आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी सत्ताधाऱ्यांवर विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करू नये अन्यथा आम्ही देखील जरांगे यांच्या विरोधात राज्यभर अभियान राबवू, असा इशारा विधान परिषदेचे भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी दिला होता.

दरम्यान, अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांचे लहाने बंधू नानासाहेब जावळे पाटील आणि आमदार दरेकर यांची नुकतीच भेट झाली. ही भेट नेमकी कशासाठी झाली? याबद्दलची सविस्तर माहिती समोर आलेली नसली, तरीही या भेटीवर संघटनेमधूनच जोरदार टिपणी झाली.

या भेटीवर अण्णासाहेब जावळे पाटील यांची मेहुणे विजय घाडगे पाटील यांनीच आक्षेप घेतला आहे. याबाबत एका व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कालही जरांगे पाटलासोबत होतो आणि उद्याही सोबत राहू, असा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील दोन जणांनी काही जणांना सोबत घेत सोमवारी ठाकरेंच्या ‘मातोश्री’ बाहेर आंदोलन केले.

मात्र, त्यांना ठाकरेंनी कसलीही दात दिली नाही. त्यानंतर मंगळवारी (ता.३०) दुपारी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे यांनी काही जणांना सोबत घेत मातोश्री बाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले. हे आंदोलन सुरू असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे त्या ठिकाणी दाखल झाले.

रमेश केरे हा भाजपाचा माणूस असल्याचे दानवे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच मंत्रालय परिसरात त्यांनी भाजपच्या मंत्र्यांचे बॅनर लावले होते. असे बोलून तुम्हाला कोणी पाठवले आहे हे मला माहिती आहे. आंदोलन नेमकं कशासाठी? अशी विचारणा केली. त्यावर केरे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या बाबत उद्धव ठाकरे यांची भूमिका काय? ओबीसीमधून आरक्षण देण्याबाबत तुमचे काय मत काय? हे घोषित करा, त्यावर दानवे यांनी आमची भूमिका आम्ही यापूर्वी जाहीर केलेली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, हे आम्ही यापूर्वी देखील सांगितलेलेच आहे. दानवे यांनी आंदोलकांबद्दल काही वक्तव्यकरून आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका जाहीर केली.

आरक्षणाचा हा प्रश्न केंद्राचा असून त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल मर्यादा वाढवून हा प्रश्न तातडीने निकाली काढावा, असा निर्णय घेत असताना माझे खासदार सरकारसोबत असतील, असेही सांगितले. ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत हा विषय केंद्राचा असल्याचे ठणकावून सांगितले. त्यामुळे केंद्र सरकार पुढाकार घेऊन खरंच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काही प्रयत्न करतयं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे आमदार दरेकर यांनी मागील आठवड्यात जरांगे पाटील यांच्या विरोधात आम्ही ‘अभियान’ राबवू असा जो इशारा दिला होता. त्याला ‘मातोश्री’ समोर आंदोलन करायला लावून सुरुवात केली आहे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवाय सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या या आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगर येथील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ‘दलाल सक्रिय झालेत’ अशा शब्दात टीका- टिपणी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!