🕒 1 min read
Ajit Pawar Vs Manoj Jarange | मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले असून जरांगे त्यांच्या सागर बंगल्याच्या (मुंबई) दिशेने रवाना झाले आहेत.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा सर्वानीच चालवली पाहिजे. मराठा आरक्षणाबद्दल राज्यप्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेतली.
त्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. मार्ग काढायचा प्रयत्न केला. जालना येथे गेले. नवी मुंबईला गेले. तरीही शिवराळ भाषा वापरली जात आहे. आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, अधिकाऱ्यांना बोलतानाही त्यांच्याशी शिवराळ भाषा वापरली जात आहे. हे नेमकं कोण करतंय हे पाहणं गरजेचं आहे असे अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल बोलताना भाषा सांभाळावी. कोणीही असं समजू नये की आपण काहीही केलं तरी चालेल. सगेसोयरे बाबत साडे सहा लाख हरकती आल्या आहेत. त्यावर सुद्धा काम सुरू आहे.
राज्यात सर्वसामान्यांचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत असताना पाठीमागे कोण आहे हे याच्या खोलात जावं लागेल. असे धाडस कसे होते? याच्या मागे कोण आहे यासाठी सरकार योग्य ती भूमिका घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- संयम ठेवला, अंत पाहू नका; मनोज जरांगेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सज्जड दम
- … तर पोलिसांना कारवाई करावीच लागेल; मनोज जरांगेंवर पोलीस कारवाईचे संकेत
- उपोषण करत असताना सुद्धा जरांगेंचा आवाज मात्र खणखणीत आणि मोठा- छगन भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











