🕒 1 min read
DNA Test | सासऱ्याने सूनेवर संशय घेणे किंवा नवऱ्याने बायकोवर संशय घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. संशय निर्माण झाल्याने DNA Test ची मागणी हि होत असते.
अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात सासऱ्याने सूनेवर संशय घेत DNA टेस्टची मागणी केली होती. डीएनए टेस्ट करणार नसेल तर नातवाला संपत्तीत अधिकार मिळणार नाही, असं सासऱ्याने सांगितले.
“सासऱ्याने तिच्या नवऱ्याच्या डोक्यात टाकलं की, त्यांचा मुलगा सूनेच्या विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलाय. जो पर्यंत तुम्ही डीएनए टेस्ट करणार नाही, तो पर्यंत संपत्तीत अधिकार मिळणार नाही” त्यावरुन मुलगा आणि वडिलांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर पती-पत्नी वेगळे राहू लागले.
काही वर्षांनंतर मध्यस्थी झाल्यानंतर मुलगा आणि सून पुन्हा घरी राहायला आले. सासऱ्याने पुन्हा एकदा नातवाच्या डीएनए टेस्टची मागणी केली. त्यानंतर मुलगा आणि सूनेने चर्चा करून DNA Test करण्याचे ठरवले.
DNA टेस्ट निकाल सासऱ्याला अपेक्षित आला नाही. टेस्टमध्ये समजलं की, मुलगा पतीपासूनच झाला आहे. पण पितृक नातेवाईकांशी त्याचा DNA जोडला जात नव्हता. म्हणून सासऱ्याने पुन्हा या महिलेवर आरोप करून परत DNA Test ची मागणी केली.
DNA Test Results exposes Father-in-law mum’s affair
महिलेवर झालेल्या आरोपानंतर पुन्हा एकदा DNA टेस्ट झाली. दोन चाचण्यांनंतर समजल की, तिचे सासरे निश्चितपणे तिच्या पतीचे वडील होते, परंतु सासऱ्याचा आणि त्यांच्या वडिलांचा DNA जोडला जात नाही आहे. त्यातून सासऱ्याच्या आईचे अफेयर असल्याचे समोर आले.
सासऱ्याचे पितृक वडिल कोणीतरी वेगळेच होते. म्हणजे सासऱ्याच्या आईचे विवाहबाह्य संबंध होते. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर सासऱ्याची फजिती झाली असून सगळ कुटुंब कोलमडून पडलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Dry Fruits Ball | मुलांना दररोज खायला द्या एक सुख्यामेवाचा एनर्जी बॉल; कसे करायचे? जाणून घ्या
- Benefits Papaya | आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तर करा पपईचा आहारात समावेश
- Weight Loss Tips | हिवाळ्यामध्ये वजन कमी करायचे आहे? तर आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











