Share

Maratha Reservation | शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय मान्य नाही, त्यांनी उद्याच अधिवेशन बोलवावं; मनोज जरांगे आक्रमक

🕒 1 min readMaratha Reservation | जालना: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. मराठा समाजाचं हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. अशात राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने दिलेला अहवाल स्वीकारला आहे. या बैठकीत 11 हजार 500 जणांच्या वंशांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Related News for Youजयंत पाटलांनी फडणवीसांना … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | जालना: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. मराठा समाजाचं हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे.

अशात राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने दिलेला अहवाल स्वीकारला आहे. या बैठकीत 11 हजार 500 जणांच्या वंशांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परंतु, राज्य सरकारचा हा निर्णय मान्य नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावं, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange commented on Maratha Reservation

पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना मनोज जरांगे म्हणाले, “राज्य शासनाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्याचबरोबर मराठा समाज अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही. आम्ही अर्धवट प्रमाणपत्र वाटू देणार नाही.

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी सरकारने उद्याच विशेष अधिवेशन बोलावून राज्यातील सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र घ्यावं.

राज्य सरकारने आज रात्रीपर्यंत निर्णय नाही घेतला तर मी उद्यापासून जलत्याग करेल. महाराष्ट्र शांत आहे. राज्यामध्ये ज्या काही घटना घडत आहे, तो गोंधळ सरकारची लोक घालत आहे.

त्यामुळे मराठ्यांच्या तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करू नका. तुम्ही जाणून-बुजून मराठा समाजावर (Maratha Reservation) अन्याय करत आहात.

मात्र, आम्ही ते सहन करू शकत नाही. आज बीड जिल्ह्यामध्ये संचारबंदी लावण्यात आली होती. ते कुणी केलं? त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही.

आमच्या तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी स्वतः बीडमध्ये एसपी, जिल्हाधिकाऱ्यांसमोर जाऊन बसेल. मी बीडला जाऊन बसलो तर किती मराठा बीडमध्ये दाखल होईल? सांगता येत नाही. मी जर बीडमध्ये गेलो तर मराठा समाजाची ताकद तुम्हाला समजेल.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!