🕒 1 min read
Imtiaz Jaleel | नवी दिल्ली: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे.
अशात एमआयएमची काय भूमिका असेल? यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाष्य केलं आहे. कुणीही कुणासोबत आलं तरी एमआयएम पुढच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
The class that believes in us is large – Imtiaz Jaleel
इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले, “आगामी निवडणुकांमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना मुस्लिम लोकांची मत हवी आहे. मात्र, त्यांना इम्तियाज जलील नको.
इंडिया आघाडीमध्ये त्यांनी जे पक्ष घेतले आहे, त्यांच्यापेक्षा जास्त आमची ताकद आहे. त्याचबरोबर आम्हाला मानणारा वर्ग देखील मोठा आहे. त्यामुळे आम्हाला कमजोर समजू नका.”
सध्या सुरू असलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं होतं. लोकसभेत या विधेयकाला मंजुरी मिळालेली असून राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू आहे.
असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं आहे. यावेळी बोलत असताना इम्तियाजली यांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये सध्या अत्यंत घाणेरडे राजकारण सुरू आहे. नेमकं कोण कोणत्या पक्षात आहे? हेच आम्हाला कळत नाही. महिला आरक्षणाचा निर्णय पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे.”
“जेव्हा सरकारकडे काही काम नसतं तेव्हा सरकार शहरांचं नाव बदलते. मात्र, शहराची नावं बदलून काय होणार आहे? मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला आलेले मंत्री फक्त घोषणा करून गेले”, औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यावर इम्तियाज जलील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | पडळकरांच्या विधानानंतर बावनकुळेंनी मागितली अजित पवारांची माफी, म्हणाले…
- Rahul Narwekar | आमदार अपात्रता प्रकरणाचा लवकरच निकल लागणार? विधानसभा अध्यक्ष तातडीने दिल्लीला रवाना
- Bacchu Kadu | अनेक महिलांचे पती परमेश्वरच काम बघतात; महिला आरक्षणावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया
- Maratha Reservation | आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद करणार नाही – मनोज जरांगे
- Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांसह सोळा आमदारांची राजकीय तिरडी बांधलीये – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











