🕒 1 min read
Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील शेतकरी आक्रमक झाले होते. यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या या ट्विटनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समस्या मुळात समजलेलीच नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Devendra Fadnavis does not understand the problem of onion farmers – Rohit Pawar
ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “मा. फडणवीस साहेब मुळात #कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समस्या तुम्हाला अद्यापही समजलेलीच दिसत नाही.
जखम डोक्याला आणि तुम्ही मलम लावताय मात्र पायाला. त्यामुळे थोडा गांभीर्याने विचार करून निर्णय घ्या. तुमच्या राजकीय खेळात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बळी देऊ नका. एकट्या नाशिक जिल्ह्यात दररोज १ लाख क्विंटल कांद्याची आवक आहे.
केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार म्हणजे केवळ २० दिवसाची आवक खरेदी करणार आहे. त्यानंतर काय? खरेदीसाठी ही मर्यादा का?
नाफेड मार्फत कांदा खरेदी केला जातो तेंव्हा कांद्याचे निर्यातक्षम गुणवत्तेचे निकष असतात. या निकषाने नाफेड खरेदी करणार असेल तर बाजाराच्या सरासरी २४१० रु दरानेच खरेदी का? बाजाराच्या उच्चांकी २८०० रु प्रती क्विंटल दराने खरेदी का केली जात नाही?
नाफेडकडे पडून असलेला कांदाही केंद्र सरकार विक्रीस काढणार आहे. त्यामुळं भविष्यात अजून भाव कोसळतील, याचा विचार शासनाने केला आहे का?
चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्यापैकी ३० ते ४० % कांदा खराब झाला. चांगला भाव मिळाला असता तर हे नुकसान भरुन काढता आलं असतं.
याचा शासनाने विचार का केला नाही? जेंव्हा कांद्याचे भाव कोसळतात तेंव्हा सरकार हस्तक्षेप करत नाही आणि आज भाव वाढण्याची केवळ शक्यता निर्माण झाली असताना सरकार हस्तक्षेप करतं, हे कुठलं धोरण? हा कुठला न्याय?
मा. फडणवीस साहेब मुळात #कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समस्या तुम्हाला अद्यापही समजलेलीच दिसत नाही. जखम डोक्याला आणि तुम्ही मलम लावताय मात्र पायाला. त्यामुळे थोडा गांभीर्याने विचार करून निर्णय घ्या. तुमच्या राजकीय खेळात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बळी देऊ नका. एकट्या नाशिक जिल्ह्यात… pic.twitter.com/3aLy07rWlj
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 22, 2023
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला.
केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | शेतकऱ्यांना दिलासा! केंद्र सरकार करणार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी
- Rohit Pawar | गावित साहेब युवकांना प्रेमाचे नाही तर शिक्षणाचे सल्ला द्या – रोहित पवार
- Sanjay Raut | कांदा परवडत नसेल तर खाऊ नका म्हणणारे मंत्री दीडशहाणे; संजय राऊतांची दादा भुसेंवर टीका
- Vijay Wadettiwar | सध्याचं सरकार म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा – विजय वडेट्टीवार
- Jayant Patil | आमच्यात आणि अजित पवार गटात वाद सुरू? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











