Share

Sanjay Raut | “… म्हणून मी नरेंद्र मोदींचे आभार मानतो…”; संजय राऊतांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Sanjay Raut | नवी दिल्ली: आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं मोदी सरकारवर (Narendra Modi ) खोचक टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आल्याचे सांगत स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घ्यायची आणि भयंकर महागाईवर नेहमीप्रमाणे ‘मौनीबाबा’ बनून राहायचे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली … Read more

Published On: 

Sanjay Raut | नवी दिल्ली: आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं मोदी सरकारवर (Narendra Modi ) खोचक टीका केली आहे.

देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आल्याचे सांगत स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घ्यायची आणि भयंकर महागाईवर नेहमीप्रमाणे ‘मौनीबाबा’ बनून राहायचे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामनातील भूमिका शिवसेनेची अधिकृत भूमिका असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आज प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “सामनातील भूमिका ही शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सामनावर आणि शिवसेनेच्या भूमिकांवर खासदारांच्या बैठकीमध्ये चर्चा करावी लागते.

कारण आम्ही ओरिजनल आहोत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भूमिका लोकांना मान्य आहे, म्हणून त्यांना यामध्ये दखल द्यावी लागते.

महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही शिवसेनेवर कितीही हल्ले केले तरी शिवसेना आणि सामना कधीच शरण जाणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेहमी सामना वाचतात, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.”

Narendra Modi should remember the situation in 2014 – Sanjay Raut

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात आम्ही शिवसेनेची साथ सोडली नाही, तर त्यांनी आमची साथ सोडली. यावर बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “शिवसेनेने आमची साथ सोडली, आम्ही शिवसेनेला सोडलं नाही असं जर प्रधानमंत्री म्हणत असतील, तर ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.

नरेंद्र मोदी यांनी 2014 मधील परिस्थिती आठवायला हवी. 2014 मध्ये शिवसेनेची साथ कुणी आणि का सोडली? हे अख्या देशानं पाहिलं आहे.

त्यानंतर शिवसेनेनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आहे. आपण वेगळे झालो आहोत, आपली युती तुटली, असं एकनाथ खडसे यांनी अधिकृतपणे आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळं शिवसेनेची साथ कुणी सोडली यासंदर्भात जुना रेकॉर्ड तपासावा.”

“भाजपला शरद पवारांविषयी आदर आहे, म्हणून त्यांनी त्यांचा पक्ष फोडला का? काँग्रेस आणि शरद पवार यांचं वेगळं राजकारण आहे. आम्ही असं म्हणतो का?

लालकृष्ण आडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून प्रधानमंत्र्यांनी थांबवलं? तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये आम्ही दखल देत नाही”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही