Share

Ambadas Danve | “आमचा नेता आजही बलशाली…”; बावनकुळेंच्या टीकेला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर भाजप आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं होतं. उद्धव ठाकरे यांना वडिलांनी … Read more

Published On: 

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

त्यांच्या या टीकेनंतर भाजप आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं होतं.

उद्धव ठाकरे यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष सांभाळता आलं नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Our leader is still strong – Ambadas Danve

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत अंबादास दानवे म्हणाले, “ज्या माणसाकडे पक्ष नाही, चिन्ह नाही अश्या उद्धवसाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाची इतकी वाट तुम्हाला पहावी लागते, चंद्रशेखर बावनकुळे जी. किती ती आतुरता तुमची? याचे कारण एकच.

हा आमचा नेता आजही तितकाच बलशाली आहे! २०२४ च्या गप्पा काय झोडता? आपल्या क्षमतांवर एवढाच दृढ विश्वास असेल तर महापालिकेच्या लांबलेल्या निवडणूका लावा. लोक कोणाच्या बाजूने कौल देतात ते!”

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. ते म्हणाले, “ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही.

तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते हे तुम्ही विसरलात की काय?

तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला.

मा. नरेंद्र मोदीजींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे आणि देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं.

औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला.

2024 सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही