Share

Eknath Shinde | आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणार? शिवसेनेच्या 40 आमदारांनी मागितली मुदतवाढ

Eknath Shinde | मुंबई: सर्वोच्च न्यायालयानं काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय दिला होता. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. या संदर्भात राहुल नार्वेकरांनी आमदारांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसचं उत्तर देण्यासाठी आमदारांनी आणखीन थोडा वेळ मागितला आहे. विधिमंडळाकडून शिवसेनेच्या आमदारांना (Eknath Shinde) नोटीस पाठवण्यात … Read more

Published On: 

Eknath Shinde | मुंबई: सर्वोच्च न्यायालयानं काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय दिला होता. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे.

या संदर्भात राहुल नार्वेकरांनी आमदारांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसचं उत्तर देण्यासाठी आमदारांनी आणखीन थोडा वेळ मागितला आहे.

विधिमंडळाकडून शिवसेनेच्या आमदारांना (Eknath Shinde) नोटीस पाठवण्यात आली होती. यामध्ये 14 आमदारांच्या उत्तराचा आढावा घेणं बाकी आहे.

सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळं आमदारांना किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rahul Narvekar had sent a notice to 40 Shivsena MLAs

काल (24 जुलै) विधिमंडळाच्या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सचिवांमध्ये आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना (Eknath Shinde) नोटीस पाठवली होती. आमदारांनी या नोटीसचं उत्तर देण्यासाठी मुदत वाढवून मागितली असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटातील 14 आमदारांच्या उत्तराचा आढावा अजून येणं बाकी आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामुळे (Eknath Shinde)  इतर कामकाज होत नसल्याचं या आमदारांनी सांगितलं आहे. त्यामुळं आमदारांना यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही