Share

Gulabrao Patil | “… म्हणून मी उद्धव ठाकरेंना सोडलं”; ठाकरेंसोबत गद्दारीच्या आरोपावर गुलाबराव पाटील यांचं स्पष्टीकरण

Gulabrao Patil | जळगाव: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर नेहमी चर्चेत असणारे गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडण्या मागचं कारण सांगितलं आहे. माझ्या आधी 32 जण गेले होते. माझा नंबर 33 वा होता, असं म्हणतं गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गुलाबराव पाटील … Read more

Published On: 

Gulabrao Patil | जळगाव: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर नेहमी चर्चेत असणारे गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडण्या मागचं कारण सांगितलं आहे. माझ्या आधी 32 जण गेले होते. माझा नंबर 33 वा होता, असं म्हणतं गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, “लोकं आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र माझ्या आधी 32 जण गेले होते. माझा नंबर 33 वा होता. जळगाव जिल्ह्यामध्ये पाच आमदार होते, त्यापैकी चार माझ्या आधी पळून गेले होते. नंतर मी एकटा राहिलो होतो.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? माझ्यावरती झाडी, डोंगर, खोके अशा जहरी टीका करण्यात आल्या. मी जर चुकीचा निर्णय घेतला असता तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आपल्या मतदारसंघात एवढी कामं झाली नसती.”

“नागपूर, बुलढाणा, नाशिक, ठाणे, दादर या ठिकाणचे आमदार गेले होते. मी आजूबाजूला नजर मारली, तर मी एकटाच राहिलो होतो. मी एकटा काय करणार होतो? मी जर गेलो नसतो तर एवढा विकास झाला असता का?”, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही