Share

Sharad Pawar | मोठी बातमी! निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये पवारांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. कारण पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक … Read more

Published On: 

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये पवारांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. कारण पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच व्हावे, असा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीत मांडला आहे. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव या बैठकीत मांडण्यात आला आहे. आता शरद पवार काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पवार समितीचा निर्णय मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी या बैठकीमध्ये दोन प्रस्ताव मांडले आहे. पहिला म्हणजे पवारांचा राजीनामा मंजूर करण्याचा आणि दुसरा पवारांनी पुन्हा अध्यक्ष व्हायचा. निवड समितीने एकमताने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे.

दरम्यान, अजित पवार बैठकीसाठी पक्ष कार्यालयात दाखल होत असताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली होती. ‘देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. यावर अजित पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते सरळ पक्षाच्या कार्यालयात निघून गेले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही