vinod tawde vs hitendra thakur | राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून सत्ता आणि पैशाचा गैरवापर सुरु आहे. आदर्श आचारसंहिता आणि नियम डावलून मतदारांना पैशांचे वाटप सुरु आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. आज भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ लोकांनी पकडले असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात विवांत हॉटेलमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. यावर, हितेंद्र ठाकूर म्हणाले “पाच कोटीच वाटप चालू आहे. मला डायऱ्या मिळाल्या आहेत. लॅपटॉप आहे. कुठे-काय वाटप झालय त्याची माहिती आहे. भाजपचा राष्ट्रीय नेता पैसे वाटायला आलाय. पोलिसांनी कारवाई करावी, त्यानंतरच आम्ही सोडू. मी कायदे-नियम पाळणारा माणूस आहे”
“त्यांनी मला 25 फोन केले. मला माफ कर, जाऊ द्या. प्लीज मला माफ कर. माझं चुकलं. माझं फोन बुक बघा. किती इनकमिंग कॉल आहेत त्यांचे. मला अगोदर न्यूज आलेली, विनोद तावडे पाच कोटी घेऊन येणार. डायऱ्या मिळाल्या आहेत, निवडणूक आयोग काय कायदेशीर कारवाई करते ते बघू” असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.
पुढे बोलतांना ठाकूर म्हणाले, “विनोद तावडे हे राष्ट्रीय नेते आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस लाज-शरम कोळून प्याले आहेत. 48 तास आधी मतदारसंघ सोडायचा असतो, हे साधं माहित नाही आणि हे राज्याचे शिक्षण मंत्री होते” अशी टीका हितेंद्र ठाकूर यांनी केली.
vinod tawde vs hitendra thakur maharashtra vidhan sabha election 2024
महत्वाच्या बातम्या