Share

Protein च्या अभावामुळे शरीरात दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच लक्ष द्या नाहीतर….

by MHD
Symptoms appear in body due to lack of protein

Protein । जर प्रथिनांची कमतरता (Protein deficiency) असेल तर शरीरातील ऊती आणि अवयवांचे नुकसान होते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन संसर्गाचा धोका वाढत जातो (Protein deficiency problem). प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात काही गोष्टींचे सेवन केले पाहिजे. (Health Tips)

केसांवर होतो परिणाम (Affects the hair)

ज्यावेळी शरीरात प्रथिने नसतात त्यावेळी केसांवर वाईट परिणाम होतो. प्रथिने नसल्यामुळे केस कमी होतात, त्यांची वाढ थांबते आणि पोत देखील खालावत जातो.

त्वचेचा रंग होतो कमी (Skin colour)

ज्यावेळी शरीरात प्रथिनेंचा अभाव असतो त्यावेळी त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्वचेवर कोरडेपणा आणि डाग दिसतात, त्वचेचा रंग कमी होऊ लागतो, प्रथिनेशिवाय, शरीर पुरेसे कोलेजेन आणि इलास्टिन तयार करू शकत नाही.

थकवा आणि अशक्तपणा (Fatigue and weakness)

ज्यावेळी शरीरात प्रथिनेचा अभाव असतो त्यावेळी नेहमीच थकवा जाणवतो.आपण आहार कितीही चांगला घेत असला तरी भरपूर झोप घ्या.

स्नायूंमध्ये वेदना (Pain in muscles)

स्नायूंमध्ये वेदना होण्याचे एक मोठे कारण शरीरात प्रथिने नाही. याचा अभाव स्नायू दुखणे, सूज आणि अशक्तपणा निर्माण करू शकतो.

High Protein Food

अशी करा प्रथिनांची कमतरता पूर्ण

प्रथिनांची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात प्रथिने समृद्ध पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. यामध्ये मासे, सोयाबीन, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, बदाम, काजू, भोपळा बियाणे, तीळ, सूर्यफूल बियाणे, शेंगदाणे मसूर आणि चणे यांचा समावेश करावा.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

महत्त्वाच्या बातम्या :

To make up for Protein deficiency, you need to include protein-rich foods in your diet. Otherwise you may get hit by it.

Health Maharashtra

Join WhatsApp

Join Now