Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
What to do in fear of a storm? – Supriya Sule
आलेल्या तुफान घाबरून काय करायचं? आलेल्या तुफान आला तोंड द्यायला शिकलं पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचं हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे. त्याचबरोबर त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून अजित पवार गटाला इशारा दिला आहे.
ट्विट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “आलं तर आलं तुफान – तूफान आलं तर घाबरून काय करायचं, तुफानाला तोंड द्यायला शिकलं पाहिजे, तुफानापासून पळून जाणाऱ्या माणसाच्या हातून काही घडत नाही, तुफानाला तोंड देण्याची जी शक्ती आणि इच्छा आहे, त्यातनं तो काहीतरी करू शकतो आणि घडवू शकतो अशी माझी धारणा आहे – यशवंतराव चव्हाण (7 मे 1984 / अहमदनगर)”
आलं तर आलं तुफान… pic.twitter.com/YduO20VplI
— Supriya Sule (@supriya_sule) July 7, 2023
दरम्यान, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलेलं हे ट्विट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केलेलं एक विधान आहे. यशवंतराव चव्हाण यांनी 7 मे 1984 रोजी अहमदनगरमध्ये हे विधान केलं होतं. या विधानाचा आधार घेत सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Aditya Thackeray | “खुर्चीचा मोह, नाती तोडतो…”; आदित्य ठाकरे यांचा नीलम गोऱ्हेंवर घणाघात
- Anil Parab | “ना इकडच्या न तिकडच्या अशी अवस्था…”; अनिल परब यांचा नीलम गोऱ्हे यांना खोचक टोला
- Mahesh Manjrekar | “माझ्या मुलानं सांगितलं तो ‘गे’ आहे तर…”; महेश मांजरेकरांचं खळबळजनक वक्तव्य
- Neelam Gorhe | “सटरफटर लोकांमुळे नाराज…”; नीलम गोऱ्हे यांचा सुषमा अंधारेंवर घणाघात
- Neelam Gorhe | ठाकरे गटाला रामराम ठोकत नीलम गोऱ्हे यांचा शिंदे गटात प्रवेश