Aditya Thackeray | “खुर्चीचा मोह, नाती तोडतो…”; आदित्य ठाकरे यांचा नीलम गोऱ्हेंवर घणाघात

Aditya Thackeray | मुंबई: विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आज ठाकरे गट सोडून शिंदे गटात गेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिंदे-भाजप गटात प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत नीलम गोऱ्हेंवर घणाघाती टीका केली आहे.

It’s a battle of selfish vs honest thinking – Aditya Thackeray

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट करत नीलम गोऱ्हे यांना सुनावलं आहे. ट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले, “स्वार्थी विरुद्ध प्रामाणिक विचारसरणी अशी ही लढाई आहे! एकाच व्यक्तीला ४ वेळा विधान परिषदेवर जाण्याची संधी उद्धवसाहेबांनी दिल्यावरही, २१ वर्ष तिथे असूनही, २ वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही…एकच गाणं आठवतं, यह मोह मोह के धागे… खुर्चीचा मोह,नाती तोडतो,नैतिकता विसरवतो!”

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “1998 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट योग्य मार्गावर जात आहे. शिंदे गट हिंदुत्वाला पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहे. म्हणून मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.”

दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेशानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात (Aditya Thackeray) पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.