Sameer Wankhede | NCB च्या अहवालात समीर वानखेडे आणि क्रांती रेडकरबाबत धक्कादायक खुलासा! जाणून घ्या सविस्तर

Sameer Wankhede | मुंबई: आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेले अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे दिवसेंदिवस या प्रकणात अडकत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर एनसीबीच्या एका अहवालातून समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालाच्या आधारे एनसीबीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात समीर वानखेडे यांच्या संपत्तीचा तपशील नमूद करण्यात आला आहे.

6 वेळा परदेशात फिरायला गेले ( Sameer Wankhede Traveled abroad 6 times)

आपल्या कुटुंबासोबत समीर वानखेडे 2017 ते 2021 या कालावधीमध्ये 6 वेळा परदेशात फिरायला गेले होते. यामध्ये त्यांनी युके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीवसारख्या देशांना भेट दिली होती. या ट्रिपसाठी वानखेडे यांनी तब्बल 8.75 कोटी लाख रुपये खर्च केल्याचे सांगितले होते. मात्र, या पैशांमध्ये एवढ्या सगळ्या देशांमध्ये जाण्याचा विमान खर्च निघणेही अवघड आहे.

मित्राला भेटायला मालदीवला गेले (Sameer Wankhede Went to Maldives to visit a friend)

समीर वानखेडे जुलै 2021 मध्ये मित्र विरल राजन यांना भेटायला कुटुंबासोबत मालदीवला गेले होते. या ठिकाणी ते मालदीवच्या Taj Exotica रिसॉर्टमध्ये थांबले होते. या ठिकाणी राहण्यासाठी त्यांनी तब्बल 7.5 लाख रुपये भरले होते. दरम्यान समीर वानखेडे यांची  चौकशी सुरू झाल्यानंतर विरल राजन यांच्या क्रेडिट कार्डवरून रिसॉर्टचे उरलेले पैसे डिसेंबर 2019 मध्ये भरले होते.

चार रोलेक्सचे घड्याळ विकत घेतले (Sameer Wankhede Bought four Rolex watches)

विरल राजन यांच्याकडून समीर वानखेडे यांनी 22 लाख रुपयांचे चार रोलेक्स घड्याळ 17.4 लाख रुपयांमध्ये उधारीवर विकत घेतले होते. या घड्याळाच्या एका बिलावर 22.5 लाख तर दुसऱ्या बिलावर 20.53 लाखाची किंमत नोंदवण्यात आली होती. त्याचबरोबर विरल राजन यांना वानखेडे यांनी चार घड्याळ विकले होते. यासाठी विरल राजनने 7.4 लाख रुपयांचा चेक समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्या नावावर जमा केला होता. या सर्व घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. समीर वानखेडे यांनी विरल राजनला इतक्या लवकर पैसे कसे दिले? त्याचबरोबर वानखेडे यांनी राजन यांच्याकडून उधार घेतलेले पैसे कसे परत केले? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

वाशिममध्ये 4.2 एकर जमीन तर मुंबईमध्ये मालकीचे 4 फ्लॅट्स (Sameer Wankhede 4.2 acres of land in Washim and 4 flats owned in Mumbai)

दरम्यान, समीर वानखेडे यांची वाशिममध्ये 4.2 एकर जमीन आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये त्यांच्या मालकीचे 4 फ्लॅट्स आहेत. तर त्यांनी गोरेगावमध्ये अडीच कोटी रुपयांचा पाचवा फ्लॅट विकत घेतला आहे. याबाबत एनसीबीच्या चौकशीत माहिती समोर आली. समीर वानखेडे यांनी दिलेल्या संपत्तीचा तपशील आणि मूळ तपशील यामध्ये बरीच तफावत असल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या