Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची संभाजी ब्रिगेडसोबत बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Uddhav Thackeray | मुंबई: शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) या दोन्ही पक्षांनी गेल्या वर्षी युतीची घोषणा केली होती. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली होती. अशात या दोन्ही संघटनाची आज मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी अनेक निर्णय घेतले.

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एक समन्वय समिती स्थापन करण्यासाठी एकत्र येणार आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये होणाऱ्या दंगली प्रकरणावर संभाजी ब्रिगेड महत्त्वाची भूमिका पार पडणार आहे. शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड संयुक्त मेळावे देखील घेणार आहेत.

एकत्र येऊन निवडणुका लढवणार असे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी युती करताना सांगितले होते. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणे खूप गरजेचे आहे. म्हणून भविष्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एक युती म्हणून काम करेल, असे देखील संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे म्हणाले होते.

आज झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे उपस्थित होते. या बैठकीमध्ये निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.