Sale on Apple Products । तुमच्याकडे आता खूप कमी किमतीत Apple च्या वस्तू खरेदी करण्याची संधी आहे. यामुळे तुम्ही हजारो रुपयांच्या बचतीसह या वस्तू घरी आणू शकता. परंतु या सेलचा लाभ घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या की ही संधी 5 जानेवारीपर्यंत आहे. त्यामुळे आजच या सेलचा लाभ घ्या.
कमी किमतीत Apple च्या वस्तू खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी कालपासून विजय सेल्सवर Apple Days सेल सुरु झाला असून तो 5 जानेवारीपर्यंत थेट राहील. यात तुम्हाला iPhone 16 66,900 रुपयांना आणि iPhone 16 Pro 75,490 रुपयांना खरेदी करता येईल. निवडक बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 4000 रुपयांची झटपट सवलत मिळेल.
जाणून घ्या संपूर्ण ऑफर
सर्वात आनंदाची बातमी म्हणजे विक्रीदरम्यान iPhones, MacBooks, iPads, वॉच, AirPods, Beats ऑडिओ उपकरणांवर सवलत आणि बँक ऑफर मिळेल. या सेलमध्ये, तुम्हाला ICICI, SBI आणि कोटक बँकेसोबतच्या व्यवहारांवर 10,000 रुपयांपर्यंतची झटपट सवलत मिळेल. हे लक्षात घ्या की स्टोअरमधील खरेदीवरील ट्रेड-इन डीलमध्ये विनिमय मूल्य देखील मिळत आहे.
तुम्हाला Apple च्या इतर उत्पादनांवरही मोठ्या सवलतीच्या ऑफर मिळत असून Apple Days सेलमध्ये iPad आणि Mac च्या खरेदीवर शानदार फायदे मिळतील. 10 व्या जनरेशनच्या आयपॅडची किंमत 29,499 रुपयांपासून सुरू आहे तर तुम्ही 50,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत M2 चिपसेटसह iPad Air खरेदी करता येईल. M4 चिपसेटसह iPad Pro 86,899 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येऊ शकतो.
iPhone 15 सीरिज आणि इतर Apple उपकरणांवर मिळेल जबरदस्त सवलत
तुम्हाला आयफोन 15 सीरीज घ्यायची असल्यास तुम्हाला आता हजारो रुपयांची बचत करता येईल. या सेलमध्ये तुम्हाला iPhone 15 केवळ 57,490 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. किमतीचा विचार करायचा झाला तर iPhone 15 Plus ची सुरुवातीची किंमत 66,300 रुपये इतकी आहे. तुम्ही iPhone 14 फक्त 48,000 रुपयांना आणि iPhone 13 फक्त 42,900 रुपयांना खरेदी करता येईल.
महत्वाच्या बातम्या :