Share

“दत्तक घेतो म्हणाले, पण ‘बाप’ पुन्हा फिरकलाच नाही..!”; राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल!

देवेंद्र फडणवीसांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती, पण त्यानंतर ते फिरकलेच नाहीत, अशी खोचक टीका राज ठाकरेंनी केली. भाजपच्या इनकमिंगवरही त्यांनी सडकून टीका केली. वाचा सविस्तर.

Published On: 

Raj Thackeray Speech: 'नाशिक दत्तक घेणारे गायब'; राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

नाशिक– राजकारणात शब्दाला किती किंमत असते, याचा प्रत्यय कधी कधी नेत्यांच्या जुन्या घोषणांवरून येतो. नाशिक दत्तक घेण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) आता याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी चांगलाच आरसा दाखवलाय. “नाशिक दत्तक घेतो म्हणाले, पण दत्तक घेतल्यावर ‘बाप’ पुन्हा इकडे फिरकलाच नाही,” अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या या विधानाने सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला खरा, पण भाजपच्या गोटात मात्र शांतता पसरली आहे.

Raj Thackeray slams Devendra Fadnavis in Nashik

नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या प्रचारसभेत राज ठाकरे आपल्या जुन्या ‘फॉर्म’मध्ये दिसले. फडणवीसांनी २०१७ मध्ये नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती, पण त्यानंतर शहराचं वाटोळं झाल्याचा आरोप राज यांनी केला. ते म्हणाले, “दत्तक घेतो म्हणणाऱ्यांच्या भुलथापांना तुम्ही बळी पडलात आणि आम्ही केलेली कामं विसरलात.”

राज यांनी फक्त दत्तक योजनेचाच समाचार घेतला नाही, तर भाजपच्या ‘मेगाभरती’वरही बोट ठेवलं. “१९५२ साली जन्मलेल्या जनसंघाला २०२६ मध्ये पोरं भाड्याने घ्यावी लागतायत,” असं म्हणत त्यांनी भाजपच्या आयाराम-गयाराम संस्कृतीचे वाभाडे काढले. “रात्री पैसे पोहोचवून दुसऱ्यांची माणसं कडेवर घेऊन का नाचताय? ती माणसं काय आनंदाने येत नाहीत,” असा खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला.

तपोवनातील झाडं तोडण्यावरूनही राज यांनी उपमांचा पाऊस पाडला. “तो लाकूडतोड्या बरा होता ज्याला सोन्याच्या कुऱ्हाडीचा मोह नव्हता. पण यांना झाडंही छाटायची आहेत आणि पक्षातले निष्ठावान कार्यकर्तेही छाटायचे आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. दिवंगत रतन टाटांनी (Ratan Tata) नाशिकमध्ये १५ कोटी खर्चून बोटॅनिकल गार्डन उभं केलं होतं, पण गेल्या ५ वर्षांत सत्ताधाऱ्यांनी त्याचीही वाट लावली, अशी खंत राज यांनी व्यक्त केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही