Share

Prithviraj Chavan | “कॅशलेस इंडिया हे मोदींचं दिवास्वप्न…”; नोटबंदी प्रकारावरणावरून पृथ्वीराज चव्हाणांची मोदी सरकारवर खोचक टीका

🕒 1 min readPrithviraj Chavan | सोलापूर: 19 मे 2023 रोजी देशात दुसऱ्यांदा नोटबंदी करण्यात आली. 2016 मध्ये पहिल्यांदा नोटबंदी करण्यात आली होती. यामध्ये 1000 आणि 500 च्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी 2000 रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्यात आली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर टीका केली … Read more

Published On: 

🕒 1 min read

Prithviraj Chavan | सोलापूर: 19 मे 2023 रोजी देशात दुसऱ्यांदा नोटबंदी करण्यात आली. 2016 मध्ये पहिल्यांदा नोटबंदी करण्यात आली होती. यामध्ये 1000 आणि 500 च्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी 2000 रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्यात आली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, “देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी नोटबंदी करण्यात आली होती. मात्र त्यामुळे देशातील भ्रष्टाचार आणखी वाढला आहे. मोदी कॅशलेस सोसायटी आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, या जगात एकाही देशामध्ये कॅशलेस अर्थव्यवस्था झालेली नाही. रोकड संपवून टाकायची हे मोदींनी पाहिलेले दिवास्वप्न आहे.”

पुढे बोलताना ते (Prithviraj Chavan) म्हणाले, “दोन हजार रुपयांची नोट फक्त काळा पैसा साठवून ठेवण्यासाठी बाजारात आणली होती. भाजप नेत्यांनी त्याचा पुरेपूर वापर केला आहे. आता पुढच्या निवडणुकीच्या आधी त्या काढून टाकायच्या आहे. मात्र, या नोटबंदीचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही.”

दरम्यान, नोटबंदी प्रकरणावरून सामना अग्रलेखाच्या (Samana Editorial) माध्यमातून मोदी सरकारवर टीकास्त्र चालवण्यात आलं आहे. “मोदी सरकार भारतीय अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा करत आहे. पहिल्या नोटबंदीचा खटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः वृत्तवाहिन्यांवर येऊन दिला होता. पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर हाहाकार उडाला होता. नोटबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा जास्तच वाढला आहे. नोटबंदीमुळे दहशतवाद्यांना होणारा अर्थ पुरवठा थांबेल, असा दावा मोदी सरकारने केला होता. मात्र, प्रत्यक्षात उलटेच झाले आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!