पृथ्वीराज चव्हाणांनी साताऱ्याची जागा लढवावी; शरद पवारांचे चव्हाणांना साकडे

Prithviraj Chavan कराड : महाविकास आघाडीकडून साताऱ्याची जागा राखण्यासाठी प्रबळ उमेदवार म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरु आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतली. सातारा मतदारसंघात भाजपाचे उदयनराजे भोसले आणि शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील या दोन खासदारांमध्ये आणि संभाव्य … Read more

Published On: 

Prithviraj Chavan कराड : महाविकास आघाडीकडून साताऱ्याची जागा राखण्यासाठी प्रबळ उमेदवार म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरु आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतली.

सातारा मतदारसंघात भाजपाचे उदयनराजे भोसले आणि शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील या दोन खासदारांमध्ये आणि संभाव्य उमेदवारांमध्ये लढत होण्याची चिन्हे होती. पण, आजारपणाचे कारण पुढे करीत श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली. उदयनराजेंसमोर शरद पवार गटाचा तगडा उमेदवार नसल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पृथ्वीराज चव्हाणांचे नाव चर्चेत आले.

जयंत पाटील यांनी कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या निवासस्थानी चर्चा केली. पृथ्वीराज चव्हाणांनी साताऱ्याची जागा लढवावी, असा शरद पवारांचा सांगावा घेऊन त्यासंदर्भात चर्चेसाठीच जयंत पाटील हे चव्हाण यांच्या भेटीला आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही