हार्दिक पांड्याची मुंबईत मोठी परीक्षा; मुंबईचा राजा ‘रोहित’ वानखेडेवर जयघोष

hardik pandya vs rohit sharma

Rohit Sharma । मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना आज मुंबईत वानखेडेवर रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात दोन्ही सामने गमावले आहेत. तर संजू सॅमसनच्या कॅप्टन्सीत राजस्थान रॉयल्सने दोन्ही सामने जिंकले आहेत.

राजस्थान रॉयलने टॉस जिकंत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

हार्दिक पांड्याची मुंबईत मोठी परीक्षा असणार आहे. मुंबईचा राजा ‘रोहित’ वानखेडेवर जयघोष सुरु आहे. मुंबईच्या पहिल्या दोन्ही सामन्यात चाहत्यांनी हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. आजच्या सामन्यावेळीही हार्दिक पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

रोहितच्या चाहत्यांकडून “मुंबईचा राज रोहित शर्मा ” अशी घोषणाबाजी सुरु आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हार्दिक पांड्याला मुंबईची धुरा दिल्यानंतर रोहित शर्माचे चाहते नाराज झाले,

वानखेडेबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. रोहितच्या चाहत्यांकडून हार्दिक पांड्याविरोधात घोषणाबाजीही सुरु आहे.

Mumbai Ka Raja, Rohit Sharma

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोवमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, आर अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, केशव महाराज, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.