अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा

Nana Patole नागपूर/मुंबई, दि १ एप्रिल । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी देशभरात रुजविला त्या सर्व आंबेडकरी-पुरोगामी चळवळीतील सहकारी सोबत आल्याचा आनंद आहे. रिपब्लकिन पक्षाच्या पाठिंब्याने मविआ आघाडीला आणखी बळ मिळाले आहे. केंद्र सरकारचे अपयश जनतेसमोर उघडे करुन महाविकास आघाडी उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचारात सहकार्य होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस … Read more

Published On: 

Nana Patole नागपूर/मुंबई, दि १ एप्रिल । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी देशभरात रुजविला त्या सर्व आंबेडकरी-पुरोगामी चळवळीतील सहकारी सोबत आल्याचा आनंद आहे.

रिपब्लकिन पक्षाच्या पाठिंब्याने मविआ आघाडीला आणखी बळ मिळाले आहे. केंद्र सरकारचे अपयश जनतेसमोर उघडे करुन महाविकास आघाडी उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचारात सहकार्य होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नागपूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रविण ऊर्फ बाळासाहेब खोब्रागडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी खोब्रागडे यांनी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याची घोषणा केली.

खोब्रागडे म्हणाले की, भाजप प्रणित केंद्र सरकारने मागील दहा वर्षात जातीय तेढ निर्माण करून अराजकता पसरविण्याचे काम केले आहे. संविधानातील हक्क आणि अधिकार यांना पायदळी तुडवून लोकशाहीची थट्टा केली आहे.

आरक्षण, रोजगार, महिला सुरक्षा हे सर्व मुद्दे दुर्लक्षित करण्यात आल्याने भाजपा सरकारला सत्तेतून पायउतार करायचे असेल तर सर्व धर्मनिरपेक्ष पुरोगामी शक्तींनी एकत्रित येऊन संविधान आणि लोकशाही अबाधित राहावी यासाठी एकत्रित लोकसभा निवडणुकीत प्रचार करणे गरजेचे आहे.

All India Republican Party | Nana Patole Press

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही