एकनाथ शिंदेंना सोलापुरात धक्का; भाजपला विरोध करत शिंदेंच्या शिलेदाराचा राजीनामा

sanjay kokate Resign

sanjay kokate सोलापूर: भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर करताच शिंदे गटाकडून विरोध सुरु झाला आहे.

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत बबन शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवली. यंदा निवडणुकीत त्यांच्यासोबत काम करणं जमणार नाही, असे सांगत संजय कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपच्या विरोधात काम करणार असल्याचे सांगितले.

संजय कोकाटे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शरद पवारांनी माढा लोकसभेसाठी उमेदवार दिला नसताना माढ्यातील मोठा नेता शरद पवारांच्या गळाला लागला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात एकीकडे मोहिते पाटलांचा विरोध आणि दुसरीकडे शिंदे गटाचा भाजपला विरोध होताना दिसत आहे. यामुळे भाजपला जबरदस्त फटका बसणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तर वंचितने रमेश बारसकर यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. शरद पवारांनी अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. माढा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.