नाना पटोलेंचा भाजप नेत्यांशी छुपा संबंध; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

Prakash Ambedkar Vs Nana Patole on BJP

Prakash Ambedkar Vs Nana Patole । अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजपमधील काही नेत्यांसोबत छुपा संबंध आहे. त्यांना भाजपविरोधात लढायचे नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठांनी आम्हाला थेट कळवल्यामुळे नाना पटोले यांना किती महत्त्व आहे, हे देखील कळले. त्याचे दु:ख पटोलेंना झाल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.

आंबेडकर म्हणाले, ‘सात जागांच्या पाठिंब्याचे पत्र काँग्रेसला दिले. त्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कोल्हापूर आणि नागपूरला पाठिंबा देण्याचे कळवल्यावर दोन्ही ठिकाणी पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसचा उमेदवार जिंकणार म्हणून पटोले यांना प्रचंड दु:ख झाले. पटोले आणि भाजपच्या काही नेत्यांसोबतचे संबंध उघड झाले. काँग्रेसने भंडारा-गोंदियातून लढण्यासाठी सांगितल्यावर पटोलेंनी यातून माघार घेतली. त्याचे खरे कारण कळले. त्यांना भाजपविरोधात लढायचे नाही.

नांदेड येथील काँग्रेसचा उमेदवार तंदुरुस्त नाही. पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्या सांगण्यावरून उमेदवार दिला, असा आरोप देखील आंबेडकर यांनी केला आहे.

Prakash Ambedkar Vs Nana Patole on BJP

काँग्रेसमध्ये अकोल्याच्या जागेवरून दोन मतप्रवाह आहेत. ‘वंचित’ महाविकास आघाडीत समाविष्ट होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता स्वतंत्र उमेदवार द्यायचा की प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्यायचा, यावरून काँग्रेसमध्ये काथ्याकूट सुरू आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना रिंगणात उतरले असून वंचित आघाडीकडून आंबेडकर निवडणुकीच्या मैदानात आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.