Share

Pune | ५ जूनपासून सिंहगड किल्ल्यावर प्लास्टिक बंदी

Pune | Plastic ban at Sinhagad । जुन्नर वन विभागाने किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर आता सिंहगडावरही जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जूनपासून प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. तसे नियोजन वन विभागाने सुरू केले आहे.

गडकिल्ल्यांवर पर्यटक मोठ्या प्रमाणावर फिरण्यासाठी येतात. सिंहगड हा तर पुणेकरांचा भटकंती करण्याचा खास किल्ला आहे. शनिवारी-रविवारी होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे गडावर सर्वत्र प्लास्टिक बाटल्या, पिशव्या दिसतात. या कचऱ्यामुळे गडाचे पावित्र्य राखले जात नाही. त्यावर उपाययोजना करण्यासाठी वन विभागाने पावले उचलली आहेत. शिवनेरी किल्ल्यावर लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. हा निर्णय लागू करण्यापूर्वी गडावर शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे प्लास्टिक बंदी निर्णयाचा कोणताही त्रास झाला नाही.

हाच कित्ता गिरवीत सिंहगडावरही पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ५ जूनपासून पायथ्यापासूनच प्लास्टिक बंदीचा निर्णय अमलात आल्यानंतर पुणेकरांना स्टीलची बाटली सोबत ठेवून गडावरील पाण्याने तहान भागवावी लागणार आहे.

सिंहगडावर सध्या स्वच्छता मोहीम सुरू असून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्याचे नियोजन सुरू असल्याचे प्रदीप संकपाळ ( वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग ) यांनी सांगितले आहे.

Pune | Plastic ban at Sinhagad fort from June 5

महत्वाच्या बातम्या

Pune | Plastic ban at Sinhagad । जुन्नर वन विभागाने किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर आता सिंहगडावरही जागतिक पर्यावरण …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Pune

Join WhatsApp

Join Now