PM Kisan Yojana | दिवाळीत मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना भेट; पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता होऊ शकतो जारी

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये … Read more

Published On: 

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते.

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देते.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते.

आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेतील 14 हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. तर शेतकरी या योजनेतील 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे.

पीएम किसान योजनेतील (PM Kisan Yojana) 15 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा हप्ता शेतकऱ्यांना 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत जारी केला जाऊ शकतो.

मात्र, केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या योजनेतील पंधरावा हप्ता जारी झाल्यानंतर शेतकरी या https://pmkisan.gov.in लिंकला भेट देऊन लाभार्थ्यांची यादी तपासू शकतात.

तर या योजनेतील 15 व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी, आधार कार्ड लिंक आणि जमिनीची पडताळणी करणे अनिवार्य आहे.

Government launched Pradhan Mantri Kisan Yojana on 24 February 2019

दरम्यान, देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी प्रधानमंत्री किसान योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. कोट्यावधी शेतकऱ्यांना आजपर्यंत या योजनेचा लाभ मिळाला आहे.

अशात ज्या शेतकऱ्यांनी अजून या योजनेसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी यासाठी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी. https://pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट देऊन शेतकरी प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेसाठी आपले नाव नोंदवू शकतात.

महत्वाची बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही