Nargis Fakhri : बॉलिवूडमध्ये (Bollywood) कमी वेळेत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. याचा कारण म्हणजे तिने बॉलिवूड गाण्यांबद्दल मोठा खुलासा केला आहे. रॉकस्टार (Rockstar), मद्रास कॅफे, मैं तेरा हिरो या सारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री नर्गिस फाखरीने काही महिन्यांपूर्वी इंडस्ट्री सोडली आहे. तर आता एका मुलाखतीमध्ये तिने या पाठीमागचे कारण देखील सागितले आहे. याच बरोबर तिने आयटम साँग्सबाबतही आपले मत व्यक्त केले आहे.
एका मुलाखतीत नर्गिस म्हणाली, ‘माझ्यासोबत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे मी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत नाहीये. मला त्याबद्दल बोलायचे नाही. हे मेल इगो इंटरनॅशनल आहे. तथापि, इंडस्ट्रीतील प्रत्येकजण असे नव्हते. मी अनेक चांगल्या लोकांसोबत काम केले आहे आणि मी अजूनही त्यांचे कौतुक करते.
नर्गिसने शाहिद कपूर आणि वरुण धवन यांच्यासोबत आयटम साँग्स केले आहे. यावर ती म्हणाली की, आयटम साँग्स तिच्यासाठी खूप नवीन होते पण अनेकजण सेटवर माझ्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत होते. असं तिने या मुलाखतीमध्ये म्हंटले आहे.
Nargis Fakhri on Item Songs
नर्गिस म्हणाली, ‘मी शाहिदसोबत ‘फटा पोस्टर निकला हिरो’ चित्रपटात आणि वरुणसोबत ‘मैं तेरा हिरो’ चित्रपटात काम केले.’ त्यावेळी आयटम साँग हा शब्द माझ्यासाठी नवीन होता. जेव्हा लोकांनी सांगितले की ती मुलगी आयटम साँग करत आहे, तेव्हा त्यांना ते चांगले वाटले नाही. हिंदी भाषेइतकेच बॉलीवूड नृत्य माझ्यासाठी परके होते.
बऱ्याचदा अभिनेत्रींना जाणूनबुजून त्यांच्या शरीराचे वरचे भाग दाखवावे लागतात, जे सुरुवातीला माझ्यासाठी खूप कठीण होते, पण नंतर मला ते मान्य झाले. सेटवरील अनेक लोक अनेक गोष्टींमध्ये गुंतलेले असतात. असो, मुंबईची संस्कृती इतर ठिकाणांपेक्षा खूप वेगळी आहे. असं ती म्हणाली.
महत्वाच्या बातम्या :