नांदेड, दि. ११ ऑगस्ट २०२४ | Eknath Shinde यांचे महायुती सरकार जनतेच्या विकासाची कामे करत नाही तर ५० टक्के कमिशनखोरी करुन मलई खात आहे. महायुती सरकार हे लोकशाही मार्गाने, जनतेने निवडून दिलेले सरकार नाही तर तोडफोड करून आयाराम, गयारामचे सरकार आहे, या असंवैधानिक ( Eknath Shinde ) सरकारवर जनतेचा विश्वास नाही. लोकसभा निवडणुकीत जसे या भाजपाला नाकारले तसेच विधानसभा निवडणुकीतही भ्रष्ट युती सरकारला हटवा व मविआचे सरकार आणा, असे आवाहन काँग्रेसने केले आहे.
रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महायुती सरकारकडे जनतेच्या योजनांसाठी पैसे नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर काही योजना जाहीर केल्या आहेत त्यासाठी इतर योजनांचा पैसा वापरला जात आहे. विधान सभा निवडणुकीला काँग्रेस मविआ एकत्र सामोरे जाणार आहेत. जागा वाटपाची चर्चाही सुरु आहे. एक सक्षम जनतेचे सरकार देण्याचा मविआचा प्रयत्न आहे. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर ठाण्यात शेण व नारळ फेकण्यात आले, त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे, राजकारणात असे प्रकार होऊ नयेत असे रमेश चेन्नीथला म्हणाले.
Nana Patole VS Eknath Shinde Maharashtra Politics
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानीबद्दल प्रश्न विचारला असता खोट्या प्रकरणाच्या आधारे त्यांचे सदस्यत्व घालवले होते. पण राहुल गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची प्रचिती पुन्हा आली आहे. हिंडनबर्गच्या अहवालाने अदानी आणि सेबी प्रमुखाच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केला आहे. सेबी व अदानी मिळून कसे गोरख धंदा करत होते ते समोर आले आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
मराठा आरक्षणावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरकारने गुलाल उधळला तो कशासाठी हे सरकारला विचारा, अर्धे मंत्रिमंडळ हाके यांच्याकडे तर अर्धे जरांगे पाटील यांच्याकडे जात होते. २०१४ साली Devendra Fadnavis यांनीच मराठा, ओबीसी, धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते मग १० वर्षे सरकार असताना त्यांनी आरक्षण का दिले नाही. जातनिहाय जनगणना करण्याची जाहीर भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे पण भाजपा सरकारचा त्याला विरोध आहे म्हणजेच त्यांचा आरक्षणाला विरोध आहे.
महायुती सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, तेलंगणा व कर्नाटकातील काँग्रेस सरकारने महालक्ष्मी योजना आधीच सुरु केली आहे. पण महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर महिलांच्या मतासाठी ही योजना आणली आहे. काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यावर महालक्ष्मी योजनेतून महिलांना जास्त पैसे दिले जातील, तरुणानांही पैसे दिले जातील, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
महत्वाच्या बातम्या