Share

सुप्रिया सुळेंच्या हॅक फोनमध्ये लपलंय काय? हॅकरला सुळेंची विनंती तर अजित पवारांना टोला

Supriya Sule phone get hack said I request to the hacker do not send any message । ‘Please don’t call or text me’: Supriya Sule says her phone, WhatsApp have been hacked

Published On: 

Supriya Sule phone get hack said I request to the hacker do not send any message

🕒 1 min read

Supriya Sule Phone Hack ।  राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. यात्रा पुण्यातील दौंडमध्ये पोहचली आहे. यात्रेत खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शरद पवार गटातील महत्वाचे नेते उपस्थित आहेत.

शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झालेल्या खासदार सुळे यांचा मोबाईल फोन हॅक झाल्याची माहिती खुद्द सुळे यांनी भाषणादरम्यान दिली. सुप्रिया सुळे यांनी व्हॉटसअॅप आणि फोन कसा हॅक झाला आणि त्यांना कसे समजले हे त्यांनी भाषण करतांना सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी X  वर करत याबद्दलची माहिती दिली.

Supriya Sule यांची X वरील पोस्ट

“अत्यंत महत्वाचे – माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी”, असे सुप्रिया सुळे यांनी X वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे. ( Supriya Sule announced her phone and WhatsApp were hacked, Durging people not to contact her. )

फोन हॅक करण्याऱ्या हॅकरला सुप्रिया सुळे यांनी विनंती करत म्हणाल्या, ” माझ्या फोनमधील सर्व ऐकावं, सर्व माहिती काढावी. मला काहीही प्रॉब्लेम नाही. फोनमध्ये लपवण्यासारखे काहीही नाही. पण फक्त माझ्या नवऱ्याला काही चुकीचे मेसेज पाठवू नका, एवढीच त्या हॅकरला विनंती आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

घडलेला घटनाक्रम सुप्रिया सुळेंनी सांगितला 

त्या म्हणाल्या, ”मी बराच वेळ माझ्या फोनवर व्यस्त होते. याचं कारण माझा फोन हॅक झाला. माझा फोन माझ्यासोबत इतर कोणीतरी ऑपरेट करत आहे. मी जेव्हा इथे आले तेव्हा माझ्या हे लक्षात आले. या ठिकाणी आल्यावर माझं व्हॉट्सअॅपच सुरु होत नव्हतं. मी जयंत पाटील यांनी मला नमस्कार मेसेज करा असे सांगितले.

त्यांनी तो मेसेज केल्यानंतर मी फोनवर काहीही न करता त्यांना समोरुन नमस्कार असा मेसेज आला. यानंतर मी माझा फोन बंद केला. मी पुन्हा दोन, तीन जणांना माझ्या फोनवर मेसेज करण्यास सांगितले. त्यांनाही समोरुन मेसेज आला. माझा फोन बंद आहे. मी सिमकार्ड काढलं आहे. पण तरीही जे कोणी मला मेसेज करतात, त्यांच्याशी कोण गप्पा मारतंय, याची मला कल्पना नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Supriya Sule WhatsApp And Phone Hack

माझा फोन हॅक कसा झाला, कोणी हॅक केला याची कल्पना नाही. हॅकरचं मला आश्चर्य वाटतंय. माझा फोन ज्यांनी कोणी माझा फोन हॅक केला असेल, त्याने नक्कीच माझ्या फोनमधील सर्व ऐकावं, सर्व माहिती काढावी. ( Supriya Sule said that her phone and WhatsApp have been hacked. “Please do not call or text me. I have reached out to the police for help.”)

सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

मला काहीही प्रॉब्लेम नाही. मला जर त्या हॅकरने विचारलं असतं, तर अशीच माहिती देऊन टाकली असती. मीच फोन त्याच्या हातात दिला असता आणि घेऊन जा, काय करायचं ते करा, असं सांगितलं असतं. पक्ष नेला, चिन्ह नेलं आणि अजून काय काय नेतील याची गॅरंटी नाही. माझ्याकडून ते सर्व घेऊन जाऊ शकतात, फक्त माझे माय-बाप मतदार घेऊन जाऊ शकत नाही, असे म्हणत सुळे यांनी अजित पवार आणि भाजपला टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!