🕒 1 min read
मुंबई – धकधक गर्ल, मोहिनी, चंद्रमुखी… कोणत्याही नावाने हाक मारा, माधुरी दीक्षित ही 90 च्या दशकातली बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री होती. ती ५८ वर्षांची झाली असली, तरी तिची लोकप्रियता तितकीच ताजी आहे. अभिनय, नृत्य, रोमान्स प्रत्येक भूमिकेला माधुरीने आपली अदा दिली.
प्रेमप्रकरणं, चर्चेतील अफेअर्स आणि नात्यांचे वाद यामुळेही तिचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहिलं. अनिल कपूरपासून अजय जडेजा आणि आमिर खानपर्यंत तिच्याशी जोडले गेलेले किस्से आजही लोकांना आठवतात.
Madhuri Dixit Unknown Stories of Affairs, Set Drama
अनिल कपूरसोबत अफेअरच्या चर्चांनंतर अनिलची पत्नी सेटवर पोहोचली
राम लखन, बेटा आणि परिंदा यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये अनिल कपूर आणि माधुरीची केमिस्ट्री जबरदस्त होती. त्यामुळे अफेअरच्या बातम्या पसरल्या. एकदा या चर्चांनंतर अनिलची पत्नी सुनीता थेट मुलांसह सेटवर पोहोचली, ज्यामुळे माधुरीने पुढे अनिलसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही वर्षांनी ते पुकार आणि २०१९ मध्ये टोटल धमालमध्ये पुन्हा एकत्र आले.
क्रिकेटपटू अजय जडेजासोबतचं अफेअर आणि ब्रेकअप
माधुरीचं नाव क्रिकेटपटू अजय जडेजासोबतही जोडलं गेलं. एकत्र जाहिरात शूट दरम्यान दोघांची ओळख झाली. पण जडेजा मॅच फिक्सिंग वादात अडकल्यानंतर हे नातं संपुष्टात आलं.
‘देवदास’ चित्रपटात माधुरी गरोदर होती
२००२ मध्ये आलेल्या देवदास चित्रपटात माधुरी गरोदर असतानाही तिने शूटिंग पूर्ण केलं. ‘हमपे ये किसने हरा रंग डाला’ हे गाणं तिने गरोदरपणात शूट केलं.
गायक सुरेश वाडकर यांनी नाकारलं लग्नाचं प्रस्ताव
माधुरीच्या वडिलांना सुरेश वाडकर पसंत होते आणि त्यांनी लग्नासाठी बोलणी केली. पण सुरेश वाडकरांनी ‘मुलगी खूप सडपातळ आहे’ असं कारण देऊन लग्नास नकार दिला.
आमिर खानने माधुरीच्या हातावर थुंकले
‘दिल’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर खानने मजेत माधुरीच्या हातावर थुंकले, कारण आमिरने भविष्य सांगतो असं माधुरीला म्हणाला होता. हे पाहून माधुरी चिडली आणि हॉकी उचलून आमिरच्या मागे धावली.
📌 महत्वाच्या बातम्या
- अनिल कपूरसोबत पुन्हा कधीच काम न करण्याचा माधुरीचा निर्णय! कारण ऐकून चाहत्यांनाही धक्का बसतोय
- शरद पवार राष्ट्रपती झाले असते, जर महायुतीत आले असते; केंद्रीय मंत्र्याचे मोठे विधान
- पाकव्याप्त काश्मीर भारताला मिळालाच पाहिजे; गरज भासल्यास पाकिस्तान ताब्यात घ्या – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now