Jitendra Awhad । अजित पवार गटाचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, यावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
“कृष्णा आंधळे (Krishna Andhale) जिवंत नसून त्याची हत्या झाली आहे. एखादा अपघात बघितल्यानंतर आपल्या डोळ्यासमोरून तो जात नाही. मग हा फोटो पाहिल्यानंतर संतोष देशमुख यांच्या मुलांना काय वाटेल? त्यांना किती मानसिक त्रास होईल, याचा विचार केला आहे का?,” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
“माझी आधीची भाषण काढून पहा. या सर्व फोटोंचे वर्णन माझ्या भाषणामध्ये आहे. ज्यावेळी संतोष देशमुख अंतिम घटका मोजत होते त्यावेळी मारणारे नालायक, नराधम, जल्लाद त्यांच्यावरती लघुशंका करत होते,” अशी संतप्त प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, “माणसाच्या अंगात इतका क्रूरपणा कोठून आला? आपल्याला एक बहीण आहे, बाप आहे, भाऊ आहे, मुलं आहेत, आपण सर्व संसाराच्या लपेटात असताना आपल्या प्रेमाचा झरा कुठे आहे?,” असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.
Jitendra Awhad on Santosh Deshmukh murder case
“जेव्हा आपल्याला काहीच होणार नाही अशी भीती जेव्हा संपते तेव्हा असे सुरू होतं. मला केलेल्या कामाबद्दल शाबासकी मिळणार आहे असे स्वप्न असते तेव्हा नराधम असे क्रूर प्रकार करतात,” असा आरोप आव्हाड यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :