Aditya Thackeray । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर आज अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून विरोधक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत होते.
अखेर आज मुंडेंनी आपण सदसद विवेवबुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणामुळे राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून सरकारवर निशाणा साधला आहे.
Aditya Thackeray post on X
आदित्य ठाकरे X वर लिहितात, “हा महाराष्ट्र थांबलाच पाहिजे! संतोष देशमुख ह्यांच्या हत्येच्या वेळेसचे माध्यमांत फिरणारे फोटो पाहून साऱ्या महाराष्ट्रासारखंच प्रचंड दुःख झालंय, चीड आलीये. मुख्यमंत्र्यांनी आता ह्या प्रकरणी ज्यांना ते आश्रय देत होते त्यांचा राजीनामा मागितल्याचंही समजतंय,” असे ठाकरे म्हणाले.
“पण ह्या राजीनाम्याला इतका वेळ का लागला? मुख्यमंत्री साहेब, कोणामुळे तुमचे हात बांधले गेले होते? देशमुखांच्या हत्येत कोण कोण सहभागी आहे ह्याचे पुरावे आणि फोटोही अनेक दिवसांपासून खात्याकडे असताना आजचा दिवस का उगवावा लागला? सर्व पक्षांनी ह्यावर आवाज उठवलाय, अगदी आपल्या पक्षाने देखील. मग मैत्रीसाठी स्वतःच्या पक्षालाही बाजूला ठेवलंत?,” असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
“एका सरपंचांचा, त्यातही आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याचा असा खून होतो आणि अनेक महिने होऊनही ठोस कारवाई होत नाही? आज महाराष्ट्रात जर सरपंचासारख्या संविधानिक पदावरील माणसाला न्याय मिळत नसेल तर महाराष्ट्रातल्या जनतेने कोणाकडून न्यायाची अपेक्षा ठेवायची? आपल्या महाराष्ट्राची इतकी दयनीय परिस्थिती ह्या आधी कधीही झालेली नव्हती. तुमच्याच कारकिर्दीत महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था इतकी ढासळत गेलीये, हाताबाहेर गेलीये,” असा आरोप ठाकरेंनी केला.
“आता केवळ मंत्रीपदाचा राजीनामा घेऊन थांबू नका, संबंधित प्रत्येकावर खटला दाखल होऊन कठोर शिक्षा व्हायलाच हवी! सारा महाराष्ट्र उद्विग्न होऊन तुमच्याकडे पाहतोय, महाराष्ट्राला न्याय हवाय! न्यायाचं, शांततेचं, सुसंस्कृत राज्य हवंय! खरंतर हे सगळं पाहून आणि आपल्या सरकारची त्यावरची ‘आळी मिळी गुप चिळी’ पाहून हे सरकारच बरखास्त केलं पाहिजे! संवेदना आहे की नाही?,” अशा शेलक्या शब्दात ठाकरेंनी टीका केली आहे.
Aditya Thackeray criticize Mahayuti Govt
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या आरोपामुळे पुन्हा एकदा महायुती सरकार विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष निर्माण झाला आहे. आदित्य ठाकरे यांच्या या आरोपांवर आता महायुती सरकार त्यांना काय प्रत्युत्तर देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :