Constipation | बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Constipation | टीम महाराष्ट्र देशा: खराब जीवनशैली आणि व्यायामाचे अभावामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. उन्हाळ्यामध्ये हा त्रास अधिक वाढत जातो. पोट फुगणे, पोट दुखी, भूक न लागणे या लक्षणांसह बद्धकोष्ठता वाढत जाते. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करू शकतात. उन्हाळ्यामध्ये बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील फळांचा समावेश करू शकतात.

सफरचंद (Apple-For Constipation)

सफरचंद आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. यामध्ये सोडियम, पोटॅशियम, विटामिन सी, फायबर, आयरन इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे बद्धकोष्ठतेच्या समस्यावर मात करण्यास मदत करतात. सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. त्याचबरोबर नियमित सफरचंद खाल्ल्याने शरीर निरोगी राहते.

संत्रा (Orange-For Constipation)

संत्र्याचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. कारण संत्र्यामध्ये फायबर, सोडियम, पोटॅशियम, विटामिन सी आणि आयरन यासारखे पोषक तत्व आढळून येतात. त्यामुळे संत्र्याचे नियमित सेवन केल्याने उन्हाळ्यामध्ये बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते. संत्र्याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

किवी (Kiwi-For Constipation)

पोषक तत्त्वांनी भरपूर असलेले किवी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. किवीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम, विटामिन ई, विटामिन सी आढळून येते, त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते. किवीचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील फळांचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर दररोज सकाळी दह्याचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Curd Benefits)

दररोज नाश्त्यामध्ये दह्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. त्याचबरोबर दह्याचे सेवन केल्याने तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Curd Benefits)

दह्यामध्ये आढळणारे गुणधर्म पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. दह्याचे सेवन केल्याने बद्धकोष्टता, जुलाब, पोट दुखी यासारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात. त्याचबरोबर दह्याचे दररोज सकाळी सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि पचनाच्या समस्या दूर होऊ शकतात. ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी त्यांच्या नाष्ट्यामध्ये दह्याचा समावेश केला पाहिजे.

हाडे मजबूत होतात (Bones become stronger-Curd Benefits)

सकाळी नाश्त्यामध्ये दह्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होऊ शकतात. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि फॉस्फरस आढळून येते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. दह्याचे सेवन केल्याने सांधेदुखी आणि हाडांशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button