Share

‘भारत-पाकिस्तान युद्ध जिंकलो, तर माधुरी माझी’; पाकिस्तानी मौलानाच्या वक्तव्यावर संतापाचा भडका

If Pakistan wins the war against India, Madhuri Dixit will be mine.

Published On: 

If Pakistan Wins War, Madhuri Dixit Will Be Mine

काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत असतानाच, पाकिस्तानातील एका मौलानाचा एक विवादित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मौलाना, आपल्या मुलासमवेत बसून, “जर पाकिस्तान भारतासोबतचे युद्ध जिंकलं, तर माधुरी दीक्षित माझी होईल” असे वक्तव्य करताना दिसतो.

या अजब मागणीनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेक भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांनी या स्त्रीविरोधी, विकृत राष्ट्रवादी आणि असभ्य वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.

If Pakistan Wins War, Madhuri Dixit Will Be Mine

या पार्श्वभूमीवर भारतात देशव्यापी युद्धजन्य मॉकड्रील्स सुरू आहेत, आणि अशावेळी पाकिस्तानातून आलेल्या अशा प्रकारच्या विधानांमुळे दोन्ही देशांतील जनतेमध्ये भावनिक उद्रेक होताना दिसतोय.

दरम्यान, पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, यामुळे आधीच देशभर हळहळ व्यक्त केली जात असताना, अशा मौलविच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे संताप अधिकच वाढला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही