Share

महाराष्ट्रात युद्धसरावाचा अलर्ट! उद्या १६ शहरांमध्ये होणार मॉकड्रील, सायरन-Blackout चा सराव

Maharashtra to conduct war-like mock drills in 16 cities on May 7 with sirens, blackouts, and emergency response training.

Published On: 

Maharashtra to Conduct War Mock Drill in 16 Cities Amid Security Alert

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार उद्या (7 मे) महाराष्ट्रातील 16 ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीचा सराव (मॉकड्रील) होणार आहे.

या मॉकड्रील दरम्यान हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यांचे सायरन वाजवले जातील, घरांतील लाईट बंद करण्याचा सराव (Blackout), नागरिकांनी खाली येऊन सुरक्षित स्थळी कसे जमा व्हावे याचे प्रात्यक्षिक, तसेच आपत्कालीन स्थितीत प्राथमिक उपचार कसे करावेत याचे मार्गदर्शन दिले जाईल.

Maharashtra to Conduct War Mock Drills in 16 Cities Amid Security Alert

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भुसावळ, संभाजीनगर, रायगड, ठाणे, उरण, तारापूर, पिंपरी-चिंचवड, मनमाड, सिन्नर, थळ वायशेत, रोहा-नागोठाणे या ठिकाणी हा सराव होणार आहे.

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी देखील अशाच प्रकारे मॉकड्रील घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी ताजमहालसारखी ऐतिहासिक स्थळे काळ्या कपड्यांनी झाकली गेली होती. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी सांगितले की, अशा सरावामुळे प्रत्यक्षात धोका निर्माण झाल्यास नागरिक घाबरून न जाता योग्य काळजी घेऊ शकतील.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही