🕒 1 min read
‘वॉर 2’ चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) हिच्या बिकिनी लूकची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. काही सेकंदांच्या दृश्यामुळेही कियारा लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली. मात्र, तिच्या या लूकवर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याने केलेली अश्लील टिप्पणी सध्या प्रचंड वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
विवादास्पद वक्तव्यांसाठी ओळखला जाणारा वर्मा याने एक्स (माजी ट्विटर) वर कियाराचा फोटो शेअर करत अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील कॅप्शन लिहिलं. या कमेंटमध्ये त्याने कियाराला ‘वॉर 2’ मधील तिच्या सहकलाकार हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांच्याशी जोडून अनुचित टिप्पणी केली.
Obscene comments on Kiara bikini look in ‘War 2’; Netizens outraged
नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत वर्माच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “इतकी गलिच्छ मानसिकता कुठून येते?”, “हा जर पब्लिकमध्ये असं लिहितो, तर प्रायव्हेटमध्ये काय करतो?”, अशा तीव्र शब्दांत टीका झाली. अखेर हा वाद चिघळल्यानंतर वर्माने आपली पोस्ट हटवली, पण तिचे स्क्रीनशॉट्स अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
‘वॉर 2’ चित्रपटातून कियाराने पहिल्यांदाच बिकिनी सीन दिला असून, अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट ऑगस्ट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कियारा, हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ ने बॉक्स ऑफिसवर 475 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे सीक्वेलविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025: GT vs LSG Dream11 टीम तयार करताना ‘या’ खेळाडूंवर ठेवा विश्वास!
- महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! 2 दिवसांत 24 मृत्यू, वीज व झाडांच्या दुर्घटनांनी वाढली चिंता
- IPL 2025: मुकेश कुमारला शिस्तभंगाबद्दल सामनाफीचा 10% दंड; मुंबईविरुद्धच्या सामन्यात संताप अनावर