Government Job | राज्य शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! 772 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Government Job | टीम महाराष्ट्र देशा: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालय (DVET), महाराष्ट्र राज्य यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार इच्छुक उमेदवार आजपासूनच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

772 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू (Application process started for filling 772 vacancies)

महाराष्ट्र शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 772 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम 316 जागा, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक) 02 जागा, अधीक्षक (तांत्रिक) 13 जागा, मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स) 46 जागा, वसतीगृह अधीक्षक 30 जागा, भांडारपाल 06 जागा, सहायक भांडारपाल 89 जागा, वरिष्ठ लिपिक 270 जागा भरण्यासाठी येणार आहे.

या भरती प्रक्रियेच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल जर बोलायचं झाले, तर या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशिलांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात किंवा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार दिनांक ९ मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवाराची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही पोस्टिंग होऊ शकते.

अधिकृत वेबसाईट

Home

जाहिरात पाहा

https://www.dvet.gov.in/wp-content/uploads/Desk/DVET_Post_Recruitment_Advt_2_2022_Ver_7.pdf

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.