Sticky Hair | उन्हाळ्यात चिकट केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Sticky Hair | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये घामामुळे केस खूप खराब होतात. घामामुळे केस चिकट व्हायला लागतात. परिणामी केस गळणे (Hair loss), केस तुटणे इत्यादी समस्या निर्माण होतात. घामामुळे केस चिकट झाल्याने खाज, जळजळ इत्यादी समस्या उद्भवला लागतात. अशा परिस्थितीत दररोज केस धुवावे लागतात. मात्र, दररोज केस धुणे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे केसातील चिकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. हे उपाय केल्याने केसांना कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. केसातील चिकटपणा दूर करण्यासाठी खालील घरगुती उपाय करा.

ग्रीन टी (Green tea For Sticky Hair)

केसांमधील चिकटपणा दूर करण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला कोमट पाण्यामध्ये ग्रीन टी मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला साधारण 30 मिनिटे केसांवर लावून ठेवावे लागेल. तीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने टाळूची पीएच पातळी नियंत्रणात राहते. उन्हाळ्यामध्ये नियमित या मिश्रणाचे वापर केल्याने केसातील चिकटपणा सहज दूर होऊ शकतो.

मुलतानी माती (Multani mati For Sticky Hair)

मुलतानी माती आपल्या त्वचेसोबतच केसांसाठी देखील खूप फायदेशीर मानली जाते. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला मुलतानी मातीमध्ये गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण वीस मिनिटं केसांना आणि टाळूला लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. आठवड्यातून एक ते दोन वेळा केसांना मुलतानी माती लावल्याने चिकटपणा दूर होऊ शकतो.

कोरफड (Aloevera For Sticky Hair)

केसांची काळजी घेण्यासाठी कोरफड खूप फायदेशीर मानली जाते. त्याचबरोबर कोरफडीच्या सहाय्याने केसातील चिकटपणा सहज दूर केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोरफडीचा गर केसांना साधारण एक तास लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस केमिकल फ्री शाम्पूने धुवावे लागेल. कोरफडीचा वापर केल्याने केसातील चिकटपणा दूर होतो आणि केस चमकदार होतात.

उन्हाळ्यामध्ये चिकट केसांच्या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही वरील घरगुती उपाय करू शकतात. त्याचबरोबर या गरम वातावरणात मधाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

उष्माघातापासून संरक्षण (Protection against heatstroke-Honey Benefits)

उन्हाळ्यामध्ये गरम वातावरणामुळे बहुतांश लोकांना उष्माघाताच्या समस्येला सामोरे जावे लागते. उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही मधाचे सेवन करू शकतात. मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात, जे उष्माघातापासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे या गरम वातावरणात उष्माघात आणि त्याची लक्षणे टाळण्यासाठी तुम्ही नियमित मधाचे सेवन करू शकतात.

शरीराला ऊर्जा मिळते (The body gets energy-Honey Benefits)

मधामध्ये कार्बोहायड्रेट आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये शरीराला ऊर्जा पुरवण्यासाठी कार्बोहायड्रेट खूप मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये येणारा थकवा आणि आळस दूर करण्यासाठी तुम्ही मधाचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्यात किंवा इतर पेयामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे लागेल. दोन चमचे मधापेक्षा जास्त मधाचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button