Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर करणार टीम इंडियात पदार्पण?

Arjun Tendulkar | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 (Indian Premier League IPL 2023) मध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा मुलगा अर्जुन तेंडुलकरने पदार्पण केले आहे. पहिल्या आयपीएल विकेटनंतर क्रिकेट विश्वात सगळीकडे अर्जंट तेंडुलकरच्या नावाची चर्चा सुरू आहे. पहिली विकेट घेत अर्जुन तेंडुलकरने थेट टीम इंडियामध्ये दावेदारी मिळवली आहे.

काल (18 एप्रिल) झालेल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 14 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सने आपली विजयाची हॅट्रिक नोंदवली. या विजयानंतर अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) लवकरच टीम इंडियात पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई आणि हैदराबाद यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ने 2.5 षटके टाकत 18 धावा देत 1 विकेट घेतली. 6.40 च्या सरासरी धावा देत त्याने गोलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये हैदराबादला विजयासाठी 20 धावांची आवश्यकता होती. कर्णधार रोहित शर्माने शेवटच्या षटकाची जबाबदारी अर्जुन तेंडुलकरवर सोपवली.  त्याने 20 व्या षटकात भुवनेश्वर कुमारला बाद करत आपली आईपीएलची पहिली विकेट घेतली आहे.

मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ला यंदाच्या लिलावात 30 लाख रुपयांनी आपल्या संघात सामील केले. होते. गेल्या दोन वर्षापासून हा खेळाडू संधीची वाट बघत होता. त्याला या वर्षी खेळायची संधी मिळली आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात मुंबईने त्याला सर्वप्रथम संघात सामील केले होते. परंतु, त्याला त्या हंगामात एकही सामना खेळता आला नव्हता.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.