CRPF Recruitment | पदवीधरांना उत्तम संधी! केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘या’ पदासाठी भरती जाहीर

CRPF Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: पदवीधर असलेल्या युवकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफ (Central Reserve Police Force) यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली असून अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

सीआरपीएफ (CRPF Recruitment) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 212 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये उपनिरीक्षक SI (RO) -19 पदे, उपनिरीक्षक SI (क्रिप्टो) – 07 पदे, उपनिरीक्षक SI (तांत्रिक) – 05 पदे, उपनिरीक्षक SI (सिव्हिल) (पुरुष) – 20 पदे, सहायक उपनिरीक्षक ASI (तांत्रिक) – 146 पदे, सहायक उपनिरीक्षक ASI (ड्राफ्ट्समन)- 15 पदे भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (CRPF Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

CRPF यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (CRPF Recruitment) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 1 मे 2023 पासून दिनांक 21 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://crpf.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://rect.crpf.gov.in/assets/PDF/172042023.pdf

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://rect.crpf.gov.in/

महत्वाच्या बातम्या