Aaditya Thackeray | “वरळी, ठाण्यातून लढण्याचं नाही तर, आता तुम्हाला सोपं चॅलेंज”; मुख्यमंत्री स्विकारणार का आदित्य ठाकरेंचं नवं चॅलेंज?

Aaditya Thackeray | औरंगाबाद : शिवसेनेचे युवानेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर त्यांनी शिंदे यांना ठाण्यातूनही निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं आहे. पण आदित्य ठाकरे यांची ही दोन्ही आव्हानं शिंदे यांनी स्वीकारली नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवं आव्हान दिलं आहे.

आदित्य ठाकरेंचं नवं चॅलेंज (Aaditya Thackeray’s New Challenge)

वरळीतून लढून दाखवण्याचं मी काल सुद्धा मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे. वरळीतून नसेल तर ठाण्यातून तरी लढून दाखवा असं मी त्यांना सांगितलं. मी त्यांना आणखी एक चॅलेंज देतो. त्यांची माझ्या विरोधात लढण्याची हिंमत किंवा ताकद नसेल तर येत्या अधिवेशनात राज्यपालांचं भाषण होण्याऐवजी महाराष्ट्र द्वेष्ट्या राज्यपालांना बदलून दाखवावं, असं आव्हाच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.

“हे चित्रं महाराष्ट्रासाठी घातक” (Aaditya Thcakeray Comment on Governor Bhagat Singh koshyari)

“राज्यपालांना जायचं आहे. त्यांनी तसं पंतप्रधानांना कळवलं आहे. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर बोलत नाहीत. हे चित्रं महाराष्ट्रासाठी घातक आहे”, अशी टीका त्यांनी केली आहे. “मुख्यमंत्री शिंदे माझ्याविरोधात वॉर्डातून लढण्यास तयार असतील तर मी वॉर्डातून लढण्यास तयार आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

“चॅलेंज स्वीकारू शकले नाहीत” (Eknath shinde Couldn’t accept the challenge)

“वेदांता फॉक्सकॉन गेल्यावर उद्योग का जातात? त्यावर माझ्याशी समोरासमोर चर्चा करा असं आव्हान मी दिलं होतं. पण त्यांनी ते स्वीकारलं नाही. त्यानंतर एअरबस गेलं. बल्क ड्रग्सपार्क असेल. काल परवा 26 हजार कोटीचा प्रकल्पही राज्यातून गेला. उद्योगावर ते बोलू शकले नाहीत आणि चॅलेंज स्वीकारू शकले नाहीत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

“28 तासात 40 कोटी खर्च”

“गुवाहाटीला ते डोंगर झाडी बघायला गेले होते. तसेच दावोसला ते बर्फ बघायला गेले होतो. 28 तासात 40 कोटी एवढा खर्च होऊच कसा शकतो? उधळपट्टी करायची ठरवली तरी 40 कोटींचा खर्च होणारच कसा? हा प्रश्न मला पडला. त्यावर चर्चा करण्याचं आव्हान दिलं होतं”, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.