Share

पुण्यात विद्यानंद बापटांवर कथित हल्ला; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले…

विद्यानंद बापटांवर पुण्यात कथित हल्ला झाल्याने ध्वनी प्रदूषण आणि DJच्या आवाजाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Published On: 

Vidyanand Bapat assaulted in Pune

Vidyanand Bapat Assault: गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav) डीजेचा वाढता आवाज आणि ध्वनी प्रदूषण यांबाबत सातत्याने जनजागृती करणारे तज्ज्ञ विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ही घटना पुण्याच्या टिळक रोड परिसरातील कशाळे चौकात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कशाळे चौक परिसरात नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होते. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर अचानक हल्ला केल्याचे वृत्त आहे. बापट यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Vidyanand Bapat assaulted in Pune

अचानक धावत आलेल्या काही जणांनी विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केला. तेव्हा हल्लेखोरानी म्हटले की “तुला कोणी ऑब्जेकशन घ्यायला सांगितलय. मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या. पुणेकरांबद्दल तुला कोणी..” असे म्हणत या हल्लेखोराने उच्चारलेले शब्द स्पष्टपणे ऐकू येत होते.

या सगळ्या प्रकरणानंतर विद्यानंद बापट यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्ती केली आहे. “तुम्ही साक्षीदार आहात. तुम्हाला माहित आहे. तुम्ही विचारत असताना एक वेडा आला त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो. पोलीसही तिथे नाहीत हे बघून त्याने हल्ला केला. आताही टेक्निकली पोलिसांकडे बंदूक नाही आहे. त्याला सवंग प्रसिद्धी हवी होती.” असे विद्यानंद बापट म्हणाले.

“तरुणांचं म्हणणं आहे की, अशा पद्धतीने भूमिका मांडून तुम्ही गणेशोत्सवाला विरोध करताय. त्यावर विद्यानंद बापट म्हणाले की, फुटेज तुमच्याकडे आहे. फुटेज बघून पोलिसांना तुडवून काढूं दे. मुद्याचं उत्तर मुद्याने द्यायचं असतं. गुद्याने द्यायचं नसतं. ते पोलिसांचं काम आहे, ते त्यांचं काम करतील.” असेही बापट म्हणाले.

संस्कृत भाषेवरील प्रभुत्वामुळे विद्यानंद बापट यांना ‘मराठीचे शशी थरूर’ म्हटले जात आहे. यावर बापट म्हणाले की, “हा प्रत्येकाच्या जजमेंटचा, पर्सनल चॉइसचा प्रश्न आहे. तुम्ही मला काय म्हणता किंवा म्हणत नाही, व्यक्ती महात्म्य वाढवणं हा उद्देश नाही.”

आता तुम्ही राज्य पातळीवरील एक व्यक्तिमत्त्व आणि सेलिब्रिटी बनला आहात. संपूर्ण राज्यात तुमच्या नावाची चर्चा होत आहे. यावर बापट म्हणाले की, “सवंग प्रसिद्धी मिळवणं हा माझा उद्देश नव्हता. पण चांगल्या कार्यासाठी प्रसिद्धी मिळत असेल तर मी त्यापासून परान्मुखही नाही.”

कोण आहेत विद्यानंद बापट ?

विद्यानंद बापट हे ध्वनी प्रदूषणाविरुद्धच्या चळवळीशी संबंधित एक अभ्यासक आणि कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गणेशोत्सव, डीजे (DJ) यंत्रणेचा वाढता वापर आणि सार्वजनिक ठिकाणचे ध्वनी प्रदूषण यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आपली मते मांडली आहेत.

अलीकडच्या काळात त्यांनी धर्म-केंद्रित राजकारण आणि विविध नागरी समस्यांवरही भाष्य केले आहे. खड्डेमुक्त रस्ते आणि २४ तास पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याला सरकारने प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

गावे किंवा रेल्वे स्थानकांची नावे बदलणे आणि उत्सवांच्या निमित्ताने केवळ देखावा निर्माण करणे या गोष्टींमुळे नागरिकांच्या दैनंदिन समस्या सुटत नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते.

तसेच, धर्माचे राजकारण आणि जनतेशी संबंधित मूलभूत प्रश्न यांची गल्लत न करता नागरी सुविधांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, यावरही त्यांनी भर दिला.

ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात डीजेचा आवाज, ध्वनी प्रदूषण आणि सार्वजनिक शांतता राखणे यांसारखे मुद्दे वारंवार चर्चेत येतात. या पार्श्वभूमीवर, बापट यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर त्यांच्यावर झालेला कथित हल्ला यामुळे हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या हल्लाप्रकरणी नेमकी कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली आहे का, यांबाबतची अधिकृत माहिती मिळाल्यावरच पुढील तपशील स्पष्ट होतील.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही