Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. ‘कुणबी’ नोंदी असलेल्या मराठा समाजाला त्यांच्या वंशावळीच्या आधारे ओबीसी (OBC) प्रमाणपत्रे मिळावीत आणि ही प्रमाणपत्रे ‘हैदराबाद गॅझेट’नुसार दिली जावीत, या मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे.
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी काल त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचे समर्थन केले. तरीही जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी उपोषण मागे घेतलेले नाही आणि ते त्यांनी पाणी प्याले. ‘हैदराबाद गॅझेट’ (Hyderabad Gazette) नुसार प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत आणि विशेषतः किमान चार प्रमाणपत्रे हाती मिळेपर्यंत, आपण उपोषण सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
Manoj Jarange hunger strike
‘हैदराबाद गॅझेट’वर आधारित प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच आपण पुढील पावले उचलण्याबाबत विचार करू, असे जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान आज धाराशिव जिल्हा बंदची हाक दिली आहे. मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थनार्थ मराठा बांधवांना विनंती करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सकल मराठा बांधवांकडून आज धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि दुकानदारांनी एक दिवस आपली दुकाने व व्यवसाय बंद ठेवून आंदोलनाला समर्थन द्यावे, असे आवाहन जरांगे यांच्या समन्वयकांकडून करण्यात आले आहे.
मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना काल या जिल्हाव्यापी बंदबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.
आज मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेण्यासाठी एक शिष्टमंडळ जाण्याची शक्यता आहे. नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाकडून ‘बंद’ची हाक देण्यात आली आहे. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘सकल मराठा समाजा’तर्फे आज परळीमध्येही बंद पुकारण्यात आला आहे.
जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज हिंगोलीत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले जाणार आहे आणि नांदेडमध्येही अशाच प्रकारच्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी काल आपली भूमिका ठाम ठेवली. त्यांनी पाणी घेण्याचे मान्य केले असले तरी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आणि सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असे जाहीर केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट; 13 जिल्ह्यांना अलर्ट, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज
- UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 4 सप्टेंबरच्या रात्री पेमेंट करता येणार नाही
- बिडकीन पोलिसांचा पुन्हा नवा प्रताप! चक्क पत्रकारालाच मागितला हप्ता; हवालदार ACB च्या जाळ्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











