Share

‘तुमच्या पंतप्रधानांची एवढी का फाटली होती?’; राऊतांचा फडणवीसांवर घणाघात

संजय राऊत यांनी महिला आरक्षणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल करत जोरदार हल्लाबोल केला.

Published On: 

Sanjay Raut attacks Devendra Fadnavis

मुंबई : महिला आरक्षण विधेयकावरून (Women Reservation Bill) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (CM Devendra Fadnavis) जोरदार टीका केली. ‘850 जागा अचानक कशा उपटल्या?’ असा सवाल करत राऊतांनी आधी महिला आरक्षण लागू करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर हल्ला चढवला होता. या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत फडणवीसांच्या दाव्यांवर थेट सवाल करत सरकारला घेरलं.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार तेच सांगत आहेत. तेव्हा काय झालं ते सांगू नका. महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झालं होतं. ते आधी लागू करा. आताच 850 जागा कशा उपटल्या? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut attacks CM Devendra Fadnavis

सीजेपी ही जर काँग्रेस जिताओ पार्टी आहे तर तुमच्या पंतप्रधानांची एवढी कशी फाटली होती? रात्री अपरात्री व्हिडीओ करून त्याच काँग्रेस जिताओ पार्टीला का चुचकारत होते? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केला.

“काल फडणवीस यांच्या व्यासपीठावर लोक झोपले होते. कोणी जांभया देत होते, काही आमदार डुलक्या काढत होते. त्यामुळे भोंगा नीट वाजवला पाहिजे. त्याला सूर लागला पाहिजे. सनई सारखा वाजला पाहिजे. जो आमचा वाजतो. एक आमदार झोपला. एक डुलक्या घेतो.” असा टोला राऊत यांनी लगावला.

पुढे ते म्हणाले की, “हे भाषण माफिया आहेत. एक दीड तास बोलतात. किती बोललं पाहिजे सत्तेवरच्या लोकांनी. ही भाषण माफियागिरी राज्याच्या हिताची नाही. तुमच्या बैठकीत बोलता ते ठिक आहे. तुम्हाला वाटतं अभ्यासपूर्ण बोलता तसं नाही.”

“महिला आरक्षण विधेयक बिल मंजूर झालं. त्यात हे का नाही? ते का नाही? ते सोडून द्या. ते बिल आधीच मंजूर झालंय ना? मग ते लागू करा. स्वत: त्यावेळी जे ट्विट केलं होतं ते वाचा. मोदींची भाषणं पाहा. आताच 850 जागा अचानक कशा उपटल्या? तेव्हा कुणी या जागांचा उल्लेख केला नव्हता. तुमच्या भाषण माफियागिरीला सर्व कंटाळले आहेत. जेनजी म्हणूनच पेटून उठले आहेत,” असा हल्लाच राऊत यांनी फडणवीस यांच्यावर चढवला.

मुख्यमंत्र्यांनी सीजेपीचा (CJP) उल्लेख ‘काँग्रेस जिताओ पार्टी’ असा केला. राऊत यांनी यावरूनही टीका केली. सीजेपी काँग्रेस जिताओ पार्टी असेल तर मग धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा का घेतला? सीजेपी काँग्रेस जिताओ पार्टी असेल तर रात्री अपरात्री येऊन तुमचे पंतप्रधान त्या काँग्रेस जिताओ पार्टीला का चुचकारत होते? एवढी का फाटली होती? असे साहिल करत राऊत यांनी सरकारला घेरले आहे.

“इन्स्टावर रिल्स करत होते. व्हिडिओ टाकत होते. तुमच्या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा का घेतला? मुख्यमंत्र्यांनी काळजीपूर्वक वक्तव्य केली पाहिजे. तोंडाला येईल ते बोलू नये, असा सल्लाही राऊत यांनी दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install